रणवीर सिंगने 'सिंघम अगेन'ला म्हटलं लेकीचा डेब्यू फिल्म, म्हणाला - "बेबी सिंबा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 02:41 PM2024-10-07T14:41:50+5:302024-10-07T14:42:34+5:30

Singham Again : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिंघम अगेन'चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Ranveer Singh calls 'Singham Again' daughter's debut film, says - "Baby Simba..." | रणवीर सिंगने 'सिंघम अगेन'ला म्हटलं लेकीचा डेब्यू फिल्म, म्हणाला - "बेबी सिंबा..."

रणवीर सिंगने 'सिंघम अगेन'ला म्हटलं लेकीचा डेब्यू फिल्म, म्हणाला - "बेबी सिंबा..."

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) त्यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट सिंघम अगेनच्या प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत. रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच कार्यक्रम नुकताच मुंबईत पार पडला. कार्यक्रमादरम्यान रणवीरने सांगितले की हा चित्रपट त्याच्या मुलीचा पहिला चित्रपट आहे, कारण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दीपिका प्रेग्नेंट होती. 

ट्रेलर लाँचवेळी रणवीर सिंग म्हणाला, "दीपिका बाळासोबत असल्यामुळे आज कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही. माझी ड्युटी रात्रीची आहे. चित्रपटात अनेक स्टार्स आहेत आणि मी सांगू इच्छितो की, माझ्या मुलीने म्हणजेच बेबी सिंबाने या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.  कारण सिंघम अगेनच्या शूटिंगदरम्यान दीपिका गरोदर होती.


रणवीर सिंगने लेकीला संबोधलं बेबी सिंबा
रणवीर म्हणाला, "लेडी सिंघम (दीपिका), सिम्बा आणि बेबी सिम्बाकडून तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ट्रेलरचा आनंद घ्या आणि तुमच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करा. आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे."

सिंघम अगेनमध्ये दिसणार हे कलाकार
सिंघम अगेनबद्दल बोलायचे तर दीपिका या चित्रपटात शक्ती शेट्टीच्या भूमिकेत दिसणार आहे, जी 'कॉप युनिव्हर्स'ची पहिली महिला आहे. या ॲक्शनने भरलेल्या चित्रपटात रणवीर पुन्हा सिंबाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर खान, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ आणि अक्षय कुमार यांच्याही भूमिका आहेत.
 

Web Title: Ranveer Singh calls 'Singham Again' daughter's debut film, says - "Baby Simba..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.