Cirkus Teaser : ये क्या बना दिया रे...? रणवीर सिंगच्या ‘सर्कस’चा टीझर पाहून नेटकरी सूसाट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 03:34 PM2022-11-28T15:34:31+5:302022-11-28T15:34:39+5:30

Ranveer Singh Cirkus Teaser : रणवीर सिंगचा ‘सर्कस’ हा नवा सिनेमा येतोय. आज या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आणि हा टीझर पाहून प्रेक्षकांची पार निराशा झाली...

ranveer singh cirkus teaser netizens says it will be flop | Cirkus Teaser : ये क्या बना दिया रे...? रणवीर सिंगच्या ‘सर्कस’चा टीझर पाहून नेटकरी सूसाट

Cirkus Teaser : ये क्या बना दिया रे...? रणवीर सिंगच्या ‘सर्कस’चा टीझर पाहून नेटकरी सूसाट

googlenewsNext

Ranveer Singh Cirkus Teaser Out : रणवीर सिंगचा आगामी सिनेमा ‘सर्कस’ येतोय. आज सोमवारी या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आणि हा टीझर पाहून प्रेक्षकांची पार निराशा झाली. टीझरमध्ये रणवीर सिंग डबल रोलमध्ये आहे. वरूण शर्मा हाही डबल रोलमध्ये दिसतोय. याशिवाय संजय मिश्रा, जॉनी लिव्हर, जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, सिद्धार्थ जाधव अशी मोठी स्टारकास्ट दिसतेय. हे सगळे कॉमिक अंदाजात चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट सांगताहेत. पण खास बात म्हणजे, यापैकी एकाच्याही कॉमेडीवर हसू येत नाही.

टीझरची सुरूवात संजय मिश्रा यांच्या डायलॉगने होते. लेडीज अ‍ॅण्ड जेंटलमॅन, वेलकम टू सिक्सटीज, असं ते म्हणतात. यावर, वो भी क्या दिन थे, जब बच्चे अपने दादा और दादी से सवाल पूछा करते थे...गूगल नहीं..., असं जॉनी लिव्हर म्हणतो... यानंतर असे एकापाठोपाठ एक डायलॉग ऐकायला मिळतात. सरतेशेवटी सर्कस का ट्रेलर 2 दिसंबर को आ रहा है..., असं रणवीर म्हणतो.

टीझर पाहून लोक म्हणाले...
‘सर्कस’च्या या टीझरची सोशल मीडियावर जबरदस्त खिल्ली उडवली जात आहे. याला टीझर म्हणतात? ही ट्रेलर अनाऊंसमेंट आहे..., असं एका युजरने लिहिलं आहे. हा सिनेमा तर 83 आणि जयेशभाई जोरदार पेक्षाही मोठा डिजास्टर ठरणार, असं एकाने लिहिलं. ये क्या बना दिया बे..., अशी कमेंट एकाने केली. सगळं काही ठीक पण रणवीरची ओव्हरअ‍ॅक्टिंग. तो या चित्रपटातही ओव्हर अ‍ॅक्टिंग करणार, लिहून घ्या, अशी कमेंट एका युजरने केली. अर्थात काहींना मात्र हा टीझर  भलताच आवडला आहे.

याआधीही ‘सर्कस’चा एक टीजर रिलीज करण्यात आला होता. यात ‘सर्कस’च्या स्टारकास्टबद्दल सांगितलं गेलं होतं. तो टीझर लोकांना आवडला होता. पण या टीझरने चाहत्यांची निराशा केली आहे. आता ट्रेलर पाहून चाहते काय प्रतिक्रिया देतात, ते बघूच.

Web Title: ranveer singh cirkus teaser netizens says it will be flop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.