या ठिकाणी होणार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचे लग्न, पाहा फोटो...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 12:16 PM2018-11-12T12:16:19+5:302018-11-12T12:20:44+5:30
इटलीतील लेक कोमो या परिसरात त्या दोघांचे लग्न होणार आहे. या दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी तिथे सध्या सुरू आहे.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग नुकतेच त्यांच्या लग्नासाठी इटलीला रवाना झाले आहेत. इटलीतील लेक कोमो या परिसरात त्या दोघांचे लग्न होणार आहे. या दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी तिथे सध्या सुरू आहे. दीपिका आणि रणवीर यांचे लग्न ज्या परिसरात होणार आहे, तिथले फोटो एनआयने नुकतेच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.
बॉलिवूडचे सर्वाधिक रोमॅन्टिक कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचे लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. २१ आॅक्टोबरला दीपिका आणि रणवीरने त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली होती. तेव्हापासून दोघेही लग्नाच्या तयारीत बिझी आहेत. १४ नोव्हेंबरला दोघे साऊथ इंडियन पद्धतीने लग्न करणार आहेत. यानंतर १५ तारखेना नॉर्थ इंडियन पद्धतीने हे लग्न होणार आहे.
दीपिका आणि रणवीर दोघे लग्नासाठी इटलीला रवाना झाले. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. मुंबई एअरपोर्टवर आधी रणवीर पोहोचला. पाठोपाठ दीपिका. दीपिकाला घ्यायला रणवीर समोर आला. यावेळी त्याने स्पीकरवर ‘मेहंदी लगा के रखना...’ गाणे प्ले केले होते. हे गाणे प्ले करत तो दीपिकाजवळ आला आणि त्याने तिला हॅलो म्हटले. पण रणवीरचे हे वागणे कदाचित दीपिकाला आवडले नाही. तिच्या चेहऱ्यावरची नाराजी कॅमेऱ्यांनी लगेच टीपली. यानंतर दीपिका व रणवीर दोघेही वेगवेगळे पुढे निघाले.
दीपिका आणि रणवीर यांचे लग्न जरी इटलीला होत असले तरी लग्नाच्या आधी करावयाचे अनेक विधी दीपिका आणि रणवीर यांनी भारतातच केले आहे. दीपिकाच्या बंगलूरुच्या घरी नुकतीच नंदी पूजा झाली तर रणवीरच्या घरी हळदीचा कार्यक्रम झाला.
रणवीर व दीपिका संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला-रामलीला चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. तेव्हापासून या कपलच्या लव्हलाईफची चर्चा होती. अर्थात दीपिका व रणवीर दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे त्यांच्यातील नाते मीडियासमोर मान्य केलेले नव्हते. त्यानंतर त्या दोघांनी बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.
Italy: Visuals from Villa del Balbianello at Lake Como in Lombardy, the venue for the wedding ceremony of Deepika Padukone and Ranveer Singh. Preparations underway. pic.twitter.com/MuuBJXos50
— ANI (@ANI) November 11, 2018