‘खिल्जी’ बनून वेडिंग पार्टीत पोहोचला रणवीर सिंग, पाहा फोटो...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:01 AM2018-11-25T11:01:11+5:302018-11-25T11:02:01+5:30

काल शनिवारी मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलात रणवीरची बहीण रितिका भवनानी हिने दीपवीरसाठी एक ग्रँड डिनर पार्टी आयोजित केली होती.

ranveer singh deepika padukone grand wedding party | ‘खिल्जी’ बनून वेडिंग पार्टीत पोहोचला रणवीर सिंग, पाहा फोटो...!

‘खिल्जी’ बनून वेडिंग पार्टीत पोहोचला रणवीर सिंग, पाहा फोटो...!

googlenewsNext
ठळक मुद्देया प्रायव्हेट डिनर पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग कायम चर्चेत आहेत. लग्नानंतर गत २१ नोव्हेंबरला बेंगळुरु येथे दीपवीरच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन झाले. यानंतर काल शनिवारी मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलात रणवीरची बहीण रितिका भवनानी हिने भाऊ आणि वहिनीसाठी एक ग्रँड डिनर पार्टी आयोजित केली होती. तुम्हाला ठाऊक नसेल की, रणवीर आपल्या मोठ्या बहिणीला ‘छोटी माँ’ म्हणतो. या प्रायव्हेट डिनर पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

होय, या पार्टीत रणवीर पुन्हा एकदा आपल्या चिरपरिचित अंदाजात दिसला. पार्टीतील त्याचे लूक बरेच वेगळे आणि कूल होते. या पार्टीसाठी त्याने पिक आणि ब्ल्यू कलरचा लॉन्ग कोट निवडला होता. या कोटवर हार्ट शेप इम्बेलिशमेंट होते. या कोटसोबत रणवीरने ब्लॅक ट्राऊजर कॅरी केला होता. त्याचे हे संपूर्ण लूक ‘पद्मावत’मधील त्याच्या खिल्जी लूकची आठवण करून देणारे ठरले.


प्राप्त माहितीनुसार, रणवीर व दीपिकासाठी आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीत केवळ कुटुंबीय आणि अतिशय जवळचे मित्र तेवढे होते. रणवीरची बहीण रितिकाने जातीने सजावटीपासून पार्टीतील मेन्यूची व्यवस्था पाहिली होती.


या पार्टीनंतर येत्या २८ नोव्हेंबरला दीपवीरचे मुंबईतचं ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. या रिसेप्शनमध्ये केवळ बॉलिवूडचे मंडळी दिसतील. मुंबईचे रिसेप्शन आटपल्यानंतर दीपवीर पुन्हाआपल्या कामाला लागणार आहेत. रणवीर सिंगचा सिम्बा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून रणवीर या चित्रपटाच्या प्रमोशनला डिसेंबरमध्ये सुरुवात करणार आहे तर दीपिका मेघना गुलजारच्या आगामी चित्रपटावर काम करणार आहे.

अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या लक्ष्मीवर आधारित चित्रपट मेघना दिग्दर्शित करत असून त्यात दीपिका मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ती मार्चमध्ये सुरुवात करणार असल्याचे कळतेय.  गत १४-१५ नोव्हेंबरला दीपवीरने सिंधी आणि कोंकणी अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले. इटलीच्या लेक कोमो येथे हा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचे अनेक फोटो दीपवीरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Web Title: ranveer singh deepika padukone grand wedding party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.