पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीवर रणवीर सिंगने दिली 'ही' प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 19:39 IST2019-03-04T19:39:12+5:302019-03-04T19:39:33+5:30
काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले.

पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीवर रणवीर सिंगने दिली 'ही' प्रतिक्रिया
काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले. यानंतर भारत पाक सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. यामुळे भारतातील अनेक चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी पाकिस्तानी कलाकारांना आपल्या चित्रपटांतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यावर आता बॉलिवूडचा सिम्बा म्हणजेच अभिनेता रणवीर सिंगने देखील मत व्यक्त केले आहे.
रणवीर सिंग म्हणाला की, “राजकारणाला देशाच्या सीमा असतात. मात्र या सीमा कला किंवा क्रीडा क्षेत्राला नसतात. त्यामुळे राजकारणाला कधीही कला किंवा क्रीडा क्षेत्राशी जोडू नये. कला, क्रीडा आणि राजकरण या गोष्टी कायम वेगळ्या ठेवायला हव्यात. पण जर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असावी ही शहीद जवानांच्या कुटुंबियांची मागणी असेल तर मी या बंदीला कधीच विरोध करणार नाही”.
रणवीर सिंगचा गत आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘गली बॉय’ हा चित्रपट एकीकडे बॉक्सआॅफिसवर धूम करतोय.
दुसरीकडे त्याचा 1983 क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या टीमवर येऊ घातलेला चित्रपटही चर्चेत आहेत. ‘83’ या चित्रपटात रणवीर भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार कपिल देव याची भूमिका साकारताना दिसणार आहे. तूर्तास रणवीरने या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे.