रणवीर सिंगने बोलून दाखवली ‘ही’ इच्छा !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 04:43 PM2019-12-15T16:43:43+5:302019-12-15T16:44:36+5:30

चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेली ही जोडी सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. अलीकडेच एका कार्यक्रमात रणवीरने इच्छा व्यक्त केली.

Ranveer Singh has said 'this' wish !! | रणवीर सिंगने बोलून दाखवली ‘ही’ इच्छा !!

रणवीर सिंगने बोलून दाखवली ‘ही’ इच्छा !!

googlenewsNext

बॉलिवूडच्या सर्वांत रोमँटिक कपलपैकी एक म्हणजे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे सध्या त्यांच्या ‘८३’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांनी गेल्या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी सिंधी पद्धतीने लग्नगाठ बांधली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेली ही जोडी सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. अलीकडेच एका कार्यक्रमात रणवीरने त्याला बाबा होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांची चर्चा रंगू लागली आहे.

रणवीरचं दीपिकावर किती प्रेम आहे हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. रणवीरचं केवळ दीपिकावर प्रेमच नाहीये तर तो तिची काळजीही तितकीच घेतो. अलिकडेच रणवीरने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्याने मला बाबा व्हायचं आहे असं सांगितलं. ‘माझी मनापासून बाबा होण्याची इच्छा आहे. मला माझ्या मुलांसोबत क्वालिटी टाइम व्यतीत करायचा आहे,’ असं रणवीर यावेळी म्हणाला. तसंच त्याने त्याच्या करिअरविषयीही काही गोष्टींचा उलगडा केला. ‘मला अभिनयाव्यतिरिक्त चित्रपटाचं दिग्दर्शन करायलाही आवडेल. तसंच मला लेखन करायला सुद्धा आवडतं. फावल्या वेळात मी काही ना काही लिहीत असतो,’ असंही तो म्हणाला.

दरम्यान, लवकरच रणवीरची मुख्य भूमिका असलेला ‘८३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये तो तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे त्याच्यासोबत दीपिकादेखील स्क्रीन शेअर करणार आहे.

Web Title: Ranveer Singh has said 'this' wish !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.