अन् रणवीर सिंगच्या गळ्यात पडून रडू लागला पाकिस्तानी चाहता; पाहा, व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 02:34 PM2019-06-18T14:34:38+5:302019-06-18T14:35:39+5:30

आयसीसी वर्ल्ड कप 2019 दरम्यान मँचेस्टरमध्ये रंगलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात अभिनेता रणवीर सिंगने माहौल केला. स्टेडियममधील रणवीरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायाल होत आहेत. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय

ranveer singh hugs a crying pakistani fan after india won the match | अन् रणवीर सिंगच्या गळ्यात पडून रडू लागला पाकिस्तानी चाहता; पाहा, व्हिडीओ

अन् रणवीर सिंगच्या गळ्यात पडून रडू लागला पाकिस्तानी चाहता; पाहा, व्हिडीओ

googlenewsNext
ठळक मुद्दे लवकरच रणवीर ‘83’ या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.

आयसीसी वर्ल्ड कप 2019 दरम्यान मँचेस्टरमध्ये रंगलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात अभिनेता रणवीर सिंगने माहौल केला. रणवीरने केवळ  टीम इंडियाला चीअर केले नाही तर तो कॉमेंट्री करतानाही दिसला. स्टेडियममधील रणवीरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायाल होत आहेत. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय. या व्हिडिओत रणवीर एका पाकिस्तानी चाहत्याचे सांत्वन करताना दिसतोय.
होय, भारत-पाक सामना भारताने जिंकल्यानंतर भारतीय चाहते सुखावले. पण पाकिस्तानचे चाहते मात्र हिरमुसले. एका पाकिस्तानी चाहत्याला तर रडू कोसळले. रणवीरची नजर या चाहत्यावर पडली आणि त्याने त्या रडणा-या फॅनला जवळ घेत मिठी मारली.



 

आतिफने रणवीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘अपना दिल छोटा मत करो, टीमने अच्छा खेला, फिर मौका मिलेगा,’ असे रणवीर या पाकिस्तानी चाहत्याना म्हणताना दिसतोय. रणवीरचा हा मनाचा मोठेपणा पाहून अनेक चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे.




भारत-पाक सामन्यादरम्यान रणवीरने अक्षरश: धम्माल केली. मैदानात त्याने ‘खली बली’ गाण्यावर डान्स केला. तर ड्रेसिंग रूममध्ये सुनील गावस्कर यांच्यासोबत ‘बदन पे सितारे लपेटे हुए’ या गाण्यावरही तो थिरकताना दिसला.




रणवीरच्या कामाबद्दल सांगायचे तर लवकरच तो ‘83’ या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता.  



 

Web Title: ranveer singh hugs a crying pakistani fan after india won the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.