रणवीर सिंगने सोडला साऊथचा सिनेमा 'राक्षस', यामागचं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 09:56 AM2024-05-22T09:56:50+5:302024-05-22T09:57:14+5:30

Ranveer Singh : दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी त्यांच्या आगामी 'राक्षस' चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात रणवीर सिंगला कास्ट करणार असल्याची चर्चा होती. आता बातमी समोर आली आहे की, रणवीरने चित्रपटातून काढता पाय घेतला आहे.

Ranveer Singh left South's film 'Rakshas', the reason behind this came to light | रणवीर सिंगने सोडला साऊथचा सिनेमा 'राक्षस', यामागचं कारण आलं समोर

रणवीर सिंगने सोडला साऊथचा सिनेमा 'राक्षस', यामागचं कारण आलं समोर

२०२४ च्या सुरुवातीला 'हनुमान' (Hanuman Movie) हा एक विलक्षण चित्रपट प्रदर्शित झाला. कमी बजेट आणि साधी स्टारकास्ट असूनही हा चित्रपट सुपरहिट ठरला. हनुमान सिनेमाचे सर्वत्र खूप कौतुक झाले. यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा (Prashant Varma) यांनी त्यांच्या आगामी 'राक्षस' चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात रणवीर सिंग(Ranveer Singh)ला कास्ट करणार असल्याची चर्चा होती. आता बातमी समोर आली आहे की, रणवीरने चित्रपटातून काढता पाय घेतला आहे.

मागील वर्षी रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्याचा एकही चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. मात्र, तो कधी शक्तिमान चित्रपटासाठी तर कधी डॉनसाठी चर्चेत असतो. अलीकडेच अशा बातम्या आल्या होत्या की तो तेलुगू चित्रपट हनुमानचे दिग्दर्शक प्रशांत वर्मासोबत राक्षस हा चित्रपटही करत आहे. तर आता अशी माहिती समोर येत आहे की, त्याने राक्षस चित्रपट सोडला आहे.

प्रोमोचे शूटिंग मध्येच सोडले
आता सिनेमाच्या कॉरिडॉरमधील बातम्या असा दावा करत आहेत की रणवीर सिंग या चित्रपटासाठी हैदराबादला गेला होता आणि चित्रपटाच्या घोषणेसाठी त्याने तिथे प्रोमोचे शूटिंग देखील सुरू केले होते. तथापि, मध्यंतरी त्याला समजले की तो अद्याप दक्षिण भारतीय चित्रपटांसाठी कंफर्टेबल नाही. त्यामुळे प्रोमो शूटच्या मध्यातून तो मुंबईत परतला आणि त्याने तो चित्रपट करण्यास नकार दिला.

राक्षस सिनेमाबद्दल साधलं मौन
काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे, की रणवीर आणि प्रशांतचा हा चित्रपट पूर्णपणे थांबलेला नाही. मात्र, अधिकृतपणे दोघेही याबाबत मौन बाळगून आहेत. अशा परिस्थितीत रणवीर आणि प्रशांतचा हा चित्रपट कोणत्या दिशेने जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

डॉन ३ मध्ये दिसणार रणवीर 
रणवीर सिंगच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्याने डॉनच्या विश्वात प्रवेश केला आहे. गेल्या वर्षी, फरहान अख्तरने त्याला त्याच्या हिट फ्रेंचाइजी डॉन ३ मध्ये मुख्य अभिनेता म्हणून कास्ट करण्याची घोषणा केली होती. यासोबतच चित्रपटातून रणवीर सिंगचा व्हिडिओही रिलीज करण्यात आला आहे. डॉन ३ मध्ये रणवीरसोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय अभिनेता सिंघम अगेनमध्येही दिसणार आहे.

Web Title: Ranveer Singh left South's film 'Rakshas', the reason behind this came to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.