OMG! रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 02:36 PM2019-08-20T14:36:25+5:302019-08-20T14:37:11+5:30
रणवीरने एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला होता. एवढेच नव्हे तर त्याने सगळ्यात पहिल्यांदा सेक्स कधी केला होता याविषयी देखील सांगितले होते.
रणवीर सिंग हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असून त्याने बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एका कंडोमच्या जाहिरातीत काम केले होते. या जाहिरातीची चांगलीच चर्चा त्याकाळात झाली होती. रणवीरला ही जाहिरात कशाप्रकारे मिळाली यामागे देखील एक किस्सा आहे.
रणवीरने या जाहिरातीच्या संदर्भात 2014 मध्ये डेक्कन क्रोनिकल या वेबसाईटला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला होता. एवढेच नव्हे तर त्याने सगळ्यात पहिल्यांदा सेक्स कधी केला होता याविषयी देखील त्याने या मुलाखतीत सांगितले होते. तो सांगतो, मी 12 वर्षांचा असेन, त्यावेळी मी सगळ्यात पहिल्यांदा सेक्स केला होता. मी केवळ उत्सुकतेपोटी माझ्यापेक्षा वयाने कित्येक वर्षं मोठ्या असलेल्या महिलेसोबत शरीरसंबंध ठेवला होता. मी प्रत्येक गोष्ट खूपच कमी वयात केली. मी काळाच्या पुढे होतो असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी शाळेत असताना माझ्या मित्रांच्या आई मला म्हणायच्या की, तू आमच्या मुलांना बिघडवत आहेस... आणि कुठे तरी हे खरे देखील होते. मी कमी वयात सेक्स केल्याने मी यात खूप एक्सपर्ट झालो होतो असे मला वाटायला लागले होते.
कंडोमची जाहिरात करण्यामागचे कारण देखील या मुलाखतीत त्याने सांगितले होते. तो सांगतो, मी एकदा माझ्या कारमध्ये बसलो होतो. त्यावेळी मी होर्डिंगवरील विविध जाहिराती पाहात होतो. होर्डिंगवर कंडोम वगळता अनेक जाहिराती मला दिसत होत्या. त्यावेळी मी विचार केला की, सेक्सच्या बाबतीत आपल्या समाजाचा दृष्टिकोन आता बदलत आहे. या विषयावर खुलेपणाने चर्चा केली जात आहे.
त्यामुळे मी माझे काम सांभाळणाऱ्या लोकांना ड्युरेक्ससोबत जाहिरातीबाबत चर्चा करायला सांगितले. खरे तर मी त्यावेळी खूप मोठी रिस्क घेतली होती. माझ्या या जाहिरातीचे कौतुक तरी केले जाईल अथवा मला लोक शिव्या तरी घालतील हे माझ्या डोक्यात पक्के होते. पण ही जाहिरात लोकांना खूपच आवडली.