दीपिका पादुकोणची ड्रग्स प्रकरणात चौकशी झाल्यानंतर रणवीर सिंगने केले पहिले ट्विट, पीएम मोदींशी आहे कनेक्शन
By गीतांजली | Published: October 9, 2020 02:33 PM2020-10-09T14:33:01+5:302020-10-09T14:33:18+5:30
अभिनेत्री दीपिका पादुकोणचे ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर पहिल्यांदा रणवीरने ट्विट केले आहे.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगलसमोर आल्यानंतर एनसीबीने अनेक बॉलिवूड सेलेब्सची चौकशी केली. यात अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशची ही चौकशी करण्यात आली. दोघींमधले ड्रग्स चॅटसमोर आले होते. यानंतर बऱ्याच दिवसांनंतर अभिनेता रणवीर सिंगने एक ट्विट केले आहे.
रणवीर सिंगने चार महिन्यानंतर एक ट्विट केले आहे. रणवीरने शेवटचे ट्विट सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर केले होते. अभिनेत्याने सुशांतला ट्विरवरुन श्रद्धांजली दिली होती. ज्यावेळी एनसीबी दीपिकाची चौकशी करत होती त्यावेळी रणवीरने सोशल मीडियावर चुप्पी साधली होती. आता रणवीरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका कॅपेनसाठी एक ट्विट केले आहे.
Let us #Unite2FightCorona ! 👊🏾🧿 https://t.co/zHN9XBCGDa
— Ranveer Singh (@RanveerOfficial) October 8, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाबद्दल सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर इतर क्षेत्रातील सेलिब्रिटींसह बॉलिवूड स्टार्सनी पंतप्रधान मोदींच्या या जनजागृती मोहिमेचे समर्थन केले. रणवीरने लिहिले, 'चला कोरोनाशी एकजूटीने लढू या'.
दीपिका ड्रग्ज प्रकरणात सहभागी असल्याचे कुठलेही ठोस पुरावे एनसीबीला मिळालेले नाहीत. चौकशीसाठी बोलवण्यात आलेल्या एकाही अभिनेत्रीला आम्ही क्लिनचीट दिलेली नाही, असा दावा एनसीबीकडून करण्यात येत आहे. मात्र अद्याप तरी एनसीबीने दीपिका व अन्य अभिनेत्रींना दुसरा समन्स बजावलेला नाही. तूर्तास दीपिकाने तरी कामावर परतण्याची तयारी सुरु केली आहे. शकुन बत्राच्या सिनेमाचे शूटींग पूर्ण करण्यासाठी ती लवकरच गोव्याला रवाना होणार असल्याचे कळते.
रियाला जामीन मिळताच दीपिका पादुकोणने सुरु केली गोव्याला जाण्याची तयारी!