रणवीर सिंग 'सर्वात प्रेमळ हिंदी अभिनेता'; SIIMA कडून बॉलिवूडच्या अभिनेत्याचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 03:45 PM2022-09-11T15:45:40+5:302022-09-11T15:46:37+5:30

साऊथ इंडियन इंटरनॅशनल मुव्ही अवॉर्ड म्हणजेच SIIMA कडून यंदा १० अवॉर्ड सोहळा साजरा होत आहे

Ranveer Singh 'Most Loveable Hindi Actor in south india'; Actor Award from SIIMA | रणवीर सिंग 'सर्वात प्रेमळ हिंदी अभिनेता'; SIIMA कडून बॉलिवूडच्या अभिनेत्याचा गौरव

रणवीर सिंग 'सर्वात प्रेमळ हिंदी अभिनेता'; SIIMA कडून बॉलिवूडच्या अभिनेत्याचा गौरव

googlenewsNext

बॉलिवूडचा बाजीराव म्हणजे रणवीर सिंगने आपल्या अभिनयातून चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. अभिनयाच्या जोरावर त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी छाप पाडली आहे. त्यासोबतच, तो आपल्या बिनधास्त आणि दिलखुलास स्वभावामुळेही ओळखला जातो. नुकतेच रणवीरला ८३ या चित्रपटातील अभिनयासाठी ६७ वा फिल्म फेअर्स अवॉर्डही मिळाला आहे. आता, सीमा या संस्थेकडून रणवीर सिंगला दक्षिण भारतातील सर्वात प्रेमळ अभिनेता म्हणून गौरविले आहे. यावेळी, बोलताना रणवीरने हा अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले.

साऊथ इंडियन इंटरनॅशनल मुव्ही अवॉर्ड म्हणजेच SIIMA कडून यंदा १० अवॉर्ड सोहळा साजरा होत आहे. त्यामध्ये, रणवीर सिंगला 'मोस्ट लव्हड हिंदी एक्टर इन साऊथ इंडिया' हा सन्मान देऊन गौरविण्यात आले. रणवीर सिंगने या अवॉर्ड सोहळ्यात धमाकेदार एंट्री घेतली होती. साऊथ स्टार अल्लू अर्जून, कमल हसन, यश यांच्यासोबत काही स्पेशन मूव्हमेंटही  शेअर केल्या आहेत. 

रणवीर पुढे म्हणाला की, दक्षिणेतील चित्रपट बंधुत्व आणि त्यातून मिळणारी मंत्रमुग्ध प्रतिभा मला प्रेरित करते. “दाक्षिणात्य सिनेमांनी कल्पनेच्या पलिकडची कल्पनाशक्ती विकसीत केली आहे, हेच तुमच्या कलाकुसरीचे श्रेय आहे, ते तुमच्या कामाला आणि प्रामाणिकपणाला आहे, असेही रणवीरने हा पुरस्कार स्विकारताना म्हटले. 
 

Web Title: Ranveer Singh 'Most Loveable Hindi Actor in south india'; Actor Award from SIIMA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.