सोशल मीडियावर क्रेझ, थिएटरमध्ये ‘दांडी गुल’! वाचा, चार दिवसांत ‘83’ने किती केली कमाई!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 03:22 PM2021-12-28T15:22:03+5:302021-12-28T15:23:05+5:30
Ranveer Singh 83 Movie Box Office Collection: रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटानं 12.64 कोटी रूपयांचा गल्ला जमवला होता. दुसऱ्या दिवशी नाताळची सुट्टी असल्याने हा सिनेमा छप्परफाड कमाई करेल, अशी अपेक्षा होती. पण...
Ranveer Singh 83 Movie Box Office Collection: ‘स्पायडर मॅन’ व ‘पुष्पा’नंतर रणवीर सिंगचा ( Ranveer singh) ‘83’ हा सिनेमा 24 डिसेंबरला चित्रपटगृहांत रिलीज झाला. साहजिकच हा सिनेमा किती कमाई करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तब्बल 270 कोटी बजेटच्या या सिनेमाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. तर चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झालेत आणि या चार दिवसांत चित्रपटाची कमाई फार काही समाधानकारक नाही.
रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटानं 12.64 कोटी रूपयांचा गल्ला जमवला होता. दुसऱ्या दिवशी नाताळची सुट्टी असल्याने हा सिनेमा छप्परफाड कमाई करेल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार, दुसऱ्या दिवशी कमाईत किंचित वाढ दिसली. पण चित्रपटाने केवळ 16.95 कोटींचा बिझनेस केला. रविवारी तिसऱ्या दिवशी 17 कोटींचा टप्पा गाठला आणि काल सोमवारी रिलीजच्या चौथ्या दिवशी ‘83’ची कमाई एकदम अर्ध्यावर आली. होय, चित्रपटाने केवळ 6.5 ते 7 कोटींचा बिझनेस केला.
#83TheFilm disappoints… Biz witnessed slight growth *outside metros* on Day 3, but not enough to cover lost ground… The jump on Day 2 [#Christmas] and Day 3 [Sun] had to be massive, since #Christmas is one of the best periods, but it was missing… DAY-WISE DATA IN NEXT TWEET… pic.twitter.com/KXEZTbywXA
— taran adarsh (@taran_adarsh) December 27, 2021
आकडेवारी बघता, गेल्या चार दिवसांत चित्रपटाने एकूण 52.50 कोटींचा बिझनेस केला आहे. सुरूवातीला या चित्रपटाबद्दल प्रचंड क्रेझ दिसली होती. सोशल मीडियावर या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. पण हे प्रेम चित्रपटगृहांपर्यंत पोहोचलेलं दिसत नाहीये. बिहार, मध्य प्रदेश व राजस्थानात चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे. मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व दिल्लीत नाईट कर्फ्यू आहे. त्यामुळे चित्रपटाचे लेट नाईट शो रद्द करण्यात आले आहेत. कदाचित याचा फटकाही सिनेमाला बसला आहे.
बॉक्स ऑफिसवर चित्रपट 100 कोटींचा आकडा गाठण्यात अपयशी ठरलाच तर हा रणवीर सिंगच्या ब्रँड व्हॅल्यूला यामुळे मोठा धक्का ठरू शकतो. जाणकारांच्या मते, ज्या स्केलवर हा चित्रपट तयार झाला, जितका या चित्रपटाचा बजेट आहे, त्या तुलनेत बॉक्स ऑफिसचे आकडे निराशाजनक आहेत.