Ranveer Singh Photoshoot: रणवीर सिंहनं संपूर्ण हद्द पार केली! न्यूड फोटोशूट करून उडवली खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 08:40 AM2022-07-22T08:40:41+5:302022-07-22T08:41:03+5:30

एका पॉप्युलर मॅगझीनसाठी रणवीरने हे फोटोशूट केले आहे. काही फोटोमध्ये तर तो पूर्णपणे नग्न दिसत आहे.

Ranveer Singh Nude Photoshoot bollywood actor ranveer singh stuns internet after doing fully nude photoshoot for popular magazine | Ranveer Singh Photoshoot: रणवीर सिंहनं संपूर्ण हद्द पार केली! न्यूड फोटोशूट करून उडवली खळबळ 

Ranveer Singh Photoshoot: रणवीर सिंहनं संपूर्ण हद्द पार केली! न्यूड फोटोशूट करून उडवली खळबळ 

googlenewsNext

बॉलीवुड जगतात आपल्या स्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या रणवीर सिंहला, त्याच्या ड्रेसिंग स्टाइलवरून लोक नेहमीच ट्रोल करत असतात. मात्र, याचा त्याला काही फरक पडत नाही. तो त्याकडे दुर्लक्ष करत, स्वतःला जे चांगले वाटते तेच करत असतो. मात्र, त्याने आता जे काही केले आहे, त्यामुळे लोकांना जबरदस्त धक्का बसला आहे. मात्र, यावेळी रणवीरने सर्वच हद्द पार केली आहे. त्याने असे काही केले आहे, ज्याचा कधी कुणी विचारही केला नसेल. रणवीरसिंहने यावेळी पूर्णपणे न्यूड फोटोशूट करून बॉलीवूड जगतात खळबळउडवून दिली आहे. त्याचे हे फोटोज सोशल मीडियावरही जबरदस्त व्हायरल होत आहेत.

एका मॅगझीनसाठी झाला न्यूड -
एका पॉप्युलर मॅगझीनसाठी रणवीरने हे फोटोशूट केले आहे. काही फोटोमध्ये तर तो पूर्णपणे नग्न दिसत आहे. रणवीरने अशा पद्धतीच्या न्यूड पोज देऊन सर्वांनाच धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, रणवीर या फोटोजमध्ये कॉन्फिडन्ट आणि आपली बॉडी दाखवतानाही दिसत आहे. अनेक चाहते रणवीरच्या या फोटोशूटचे कौतुक करताना दिसत आहेत. तर, अनेक जण त्याच्या या फोटोजवर विश्वास ठेवायलाही तयार नाहीत.

खरे तर, रवीरचा असा अंदाज यापूर्वी कधीही कुणी पाहिला नसेल. यामुळेच त्याच्या चाहत्यांना त्याच्या या फोटोशूटवर विश्वास ठेवणे जड जात आहे.

दिल्या वेगवेगळ्या पोज -
या फोटोशूटमध्ये रणवीर वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. या मॅगझीनसोबत रणवीरने आपल्या चित्रपटांसदर्भातही चर्चा केली आहे. या फोटोजसोबत रणवीरची मुलाखतही देण्यात आली आहे. या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर अनेक जण त्याला ट्रोलही करत आहेत.


 

 

Web Title: Ranveer Singh Nude Photoshoot bollywood actor ranveer singh stuns internet after doing fully nude photoshoot for popular magazine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.