रणवीर सिंग दिसणार या सुपरहिरोच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 20:13 IST2019-12-12T20:13:16+5:302019-12-12T20:13:36+5:30
प्रसिद्ध कॉमिक कॅरेक्टरच्या अवतारात रणवीर सिंग दिसणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

रणवीर सिंग दिसणार या सुपरहिरोच्या भूमिकेत
बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगचे चित्रपट पाहिले तर नेहमी तो वेगवेगळे भूमिका व स्क्रीप्टची निवड करताना दिसतो. इतकंच नाही तर तो त्याच्या प्रत्येक भूमिकेसाठी जीतोड मेहनत घेतो. तो प्रत्येक भूमिकेत स्वतःला सामावून घेतो. आता समजतंय की रणवीर सिंग एका भारतीय सुपरहिरोची भूमिका साकारताना दिसू शकतो. ही भूमिका प्रसिद्ध कॉमिक बुक सीरिज नागराजवर आधारीत असेल. करण जोहर यावर चित्रपट बनवण्याचा विचार करतो आहेत. याबद्दल करण व रणवीरसोबत बातचीत सुरू आहे.
राज कॉमिक्सचे सहसंस्थापक संजय गुप्ता यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून करण जोहरच्या या आगामी प्रोजेक्टची माहिती दिली आहे. “करण जोहर, रणवीर सिंग आणि नागराज यांच्या भेटीगाठी गेल्या काही काळात वाढल्या आहेत.” अशा आशयाची पोस्ट संजय गुप्ता यांनी लिहिली आहे.
या पोस्टमुळे राज कॉमिक्स आणि धर्मा प्रोडक्शन एकत्र येऊन एका सुपरहिरो चित्रपट मालिकेची निर्मिती करणार आहेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नागराज हा एक कॉमिक्स सुपरहिरो आहे. राजकुमार गुप्ता, मनोज गुप्ता व संजय गुप्ता या तिघांनी मिळून १९८६ साली राज कॉमिक्ससाठी ‘नागराज’ या सुपरहिरो व्यक्तिरेखेची निर्मिती केली होती. लहान मुलांच्या सर्वाधिक आवडत्या भारतीय सुपरहिरोंपैकी एक म्हणून नागराज ओळखला जातो. नागराजच्या भूमिकेत रणवीर सिंगला पाहणं कमालीचं ठरणार आहे.