मेघना गुलजार करणार ‘गली बॉय’ला ‘राजी’! रणवीर सिंग बनणार ‘सॅम बहाद्दूर’!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 03:14 PM2019-03-11T15:14:22+5:302019-03-11T15:16:53+5:30
एकापाठोपाठ सुपरहिट चित्रपट देणाचा धडाका लावणारा अभिनेता रणवीर सिंग आणखी एका धमाकेदार चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. होय, सगळे काही जुळून आले तर लवकरच दिग्दर्शिका मेघना गुलजारच्या चित्रपटात रणवीर दिसू शकतो.
एकापाठोपाठ सुपरहिट चित्रपट देणाचा धडाका लावणारा अभिनेता रणवीर सिंग आणखी एका धमाकेदार चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. होय, सगळे काही जुळून आले तर लवकरच दिग्दर्शिका मेघना गुलजारच्या चित्रपटात रणवीर दिसू शकतो. ‘तलवार’, ‘राजी’ असे सुपरहिट चित्रपट देणारी मेघना फील्ड मार्शल सॅम माणकेशॉ यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार आहे. हा चित्रपट रॉनी स्क्रूवाला प्रोड्यूस करणार आहे.
दीर्घकाळापासून मेघना सॅम माणकेशॉ यांच्यावर रिसर्च करतेय. या चित्रपटात रणवीरने सॅम माणकेशॉ यांची भूमिका साकारावी अशी मेघनाची इच्छा आहे. अद्याप रणवीरने हा चित्रपट साईन केलेला नाही. पण मेघनाचा हा चित्रपट रणवीर साईन करेल, याची शक्यता अधिक आहे. याचे कारण म्हणजे, मेघना सध्या रणवीरची पत्नी दीपिका पादुकोणसोबत काम करतेय. मेघनाच्या ‘छपाक’ या चित्रपटात दीपिका लीड रोलमध्ये आहे. ‘छपाक’साठी मेघनाने दीपिकाला ‘राजी’ केलेय. त्यामुळे रणवीरला ‘राजी’ करणे तिच्यासाठी फार कठीण नाही.
भारतीय लष्करात ‘फिल्ड मार्शल’ हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले अधिकारी अशी जनरल सॅम माणकेशॉ यांची ओळख. १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात सॅम माणकेशॉ लष्कराचे यशस्वी नेतृत्व केले होते. ते सॅम बहाद्दूर या नावानेही प्रसिद्ध होते. १९७१ च्या युद्धात भारताने माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा जबरदस्त पराभव केला व बांगलादेशाची निर्मिती केली. माणेकशॉ यांच्या प्रभावी कामगीरीने तत्कालीन भारताचे राष्ट्रपती वराहवेंकट गिरी यांनी माणेकशॉ यांना १९७२ पद्मभूषण या सन्मानाने सन्मानित केले. जानेवारी १ १९७३ रोजी माणेकशॉ यांना अतिशय खास असे फिल्ड मार्शलचे पद मिळाले स्वतंत्र भारतात केवळ दोनच व्यक्तींना हे पद मिळाले आहे. या पदावरील व्यक्ती कार्यरत नसली तरी अधिकारीक दृष्ट्या निवृत होत नाही.