वॉव! ट्रेंडचा डायलॉग म्हणत रणवीर सिंहने केलं नीता अंबानींचं कौतुक, म्हणाला, 'जग तुम्हाला...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 15:53 IST2023-11-01T15:52:48+5:302023-11-01T15:53:24+5:30
रणवीरचे कौतुकाचे शब्द ऐकून नीता अंबानी यांच्या चेहऱ्यावरही आनंद स्पष्ट दिसत होता.

वॉव! ट्रेंडचा डायलॉग म्हणत रणवीर सिंहने केलं नीता अंबानींचं कौतुक, म्हणाला, 'जग तुम्हाला...'
रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या जियो वर्ल्ड येथे लग्जरी मॉलचं काल उद्घाटन झालं. यासाठी फॅशनेबल अंदाजात बॉलिवूड स्टार्स अवतरले. मुकेश अंबानी आपल्या संपूर्ण परिवारासह उपस्थित होते. तर सलमान खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, आलिया भट, सोनम कपूर, श्रद्धा कपूर, कतरिना कैफ यांच्यासह अनेक कलाकारांनी शोभा वाढवली. यावेळी ऑल टाईम एनर्जिटिक रणवीर सिंहने (Ranveer Singh) रॅम्पवॉक केला. यावेळी त्याने नीता अंबानींची स्तुती केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
जियो वर्ल्ड प्लाझा (Jio World Plaza) च्या उद्घाटनाला रणवीर सिंहने ब्लॅक लुक कॅरी केला होता. यामध्ये तो नेहमीप्रमाणेच हँडसम हंक दिसत होता. यावेळी त्याने रॅम्प वॉक केला आणि नंतर नीता अंबानी यांची खूप स्तुती केली. रणवीरचे कौतुकाचे शब्द ऐकून नीता अंबानी यांच्या चेहऱ्यावरही आनंद स्पष्ट दिसत होता.
सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला 'जस्ट लुकिंग लाईक अ वॉव' हा डायलॉग रणवीर नीता अंबानींसाठी बोलताना दिसत आहे. तेव्हा नीताजींच्या चेहऱ्यावरही कमालीचा आनंद दिसून येत आहे. यानंतर रणवीर सिंह म्हणतो,'संपूर्ण जग त्यांना मिसेस नीता मुकेश अंबानी नावाने ओळखतं. आम्ही त्यांना प्रेमाने भाभी म्हणतो.' अशा शब्दात रणवीर सिंहने नीता अंबानींचं कौतुक केलं.
रणवीर सिंह सध्या 'डॉन 3' च्या तयारित व्यस्त आहे. शिवाय तो संजय लीला भन्साळींच्या 'बैजू बावरा' आणि रोहित शेट्टीच्या 'सिंघम अरेन' मध्ये दिसणार आहे.