दीपिका पादुकोणसोबतच्या घटस्फोटांच्या चर्चांना रणवीर सिंगने लावला पूर्णविराम, शेअर केला रोमाँटिक फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 18:09 IST2023-07-10T17:26:52+5:302023-07-10T18:09:17+5:30
गेल्या काही दिवसांपासून दीपिका-रणवीर त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत होते.

दीपिका पादुकोणसोबतच्या घटस्फोटांच्या चर्चांना रणवीर सिंगने लावला पूर्णविराम, शेअर केला रोमाँटिक फोटो
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे ग्लॅमर जगातील अशा जोडप्यांपैकी एक आहे, ज्यांची केमिस्ट्री नेहमीच चर्चेचा विषय राहते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दीपिका -रणवीर त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत होते. या दोघांच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली होती.
रणवीर सिंगच्या 38 व्या वाढदिवसानिमित्त दीपिका पादुकोणने तिच्या पतीसाठी सोशल मीडियावर एकही पोस्ट केली नव्हती. दीपिकाने रणवीरसाठी काहीही पोस्ट न केल्यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला की काय असा चर्चा लोकांमध्ये सुरु झाली होती. आता रणवीरने स्वतःच्या अंदाजात या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे.
रणवीर सिंगने 9 जुलै 2023 रोजी पत्नी दीपिका पादुकोणसोबतचा एक सुंदर फोटो त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. समुद्राच्या मध्यभागी जहाजाच्या खिडकीबाहेरील दृश्याचा आनंद लुटताना दीपिका आणि रणवीरचे हा फोटो पाहून हे स्पष्ट होतेय की दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत.
रणवीर आणि दीपिका रविवारी अलिबागहून मुंबईला परतताना दिसले. पापाराझीने त्यांना त्यांच्या आलिशान कारमध्ये बसलेले पाहिले. व्हिडिओमध्ये समोरच्या सीटवर बसलेला रणवीर मागे बसलेल्या लेडी लव्हशी बोलताना दिसत आहे. पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे की, अलिबागमध्ये वाढदिवस साजरा करून हे जोडपे मुंबईला परतले आहे.
रणवीर आणि दीपिका अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अभिनेता अनेकदा त्याच्या पत्नीला लकी चार्म म्हणतो. या जोडप्याने 2018 मध्ये लग्न केले.