रणवीरने कपिल देव यांच्याकडे मागितली होती मीटिंगमध्ये बसण्याची परवानगी, मिळालं होतं मजेदार उत्तर..
By अमित इंगोले | Updated: October 15, 2020 14:47 IST2020-10-15T14:24:28+5:302020-10-15T14:47:40+5:30
सिनेमाचे दिग्दर्शक कबीर सिंहने या सिनेमाच्या तयारीचा एक किस्सा एका चॅट शोमध्ये सांगितला. त्यांनी सांगितले की, रणवीरला कपिल यांच्या मीटिंगमध्ये बसायचं होतं. पण कपिल देव यांनी यावर मजेदार उत्तर दिलं होतं.

रणवीरने कपिल देव यांच्याकडे मागितली होती मीटिंगमध्ये बसण्याची परवानगी, मिळालं होतं मजेदार उत्तर..
अभिनेता रणवीर सिंह हा '८३' सिनेमात क्रिकेटर कपिल देवची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंहने बरीच मेहनत घेतली आहे. सिनेमाचे दिग्दर्शक कबीर सिंहने या सिनेमाच्या तयारीचा एक किस्सा एका चॅट शोमध्ये सांगितला. त्यांनी सांगितले की, रणवीरला कपिल यांच्या मीटिंगमध्ये बसायचं होतं. पण कपिल देव यांनी यावर मजेदार उत्तर दिलं होतं.
कपिल देव यांनी दिलं होतं मजेदार उत्तर
नेहा धुपियाच्या रेडीओ शोमध्ये कबीर सिंहने सांगितले की, कशाप्रकारे रणवीरला प्रत्येक ठिकाणी कपिल देव यांचा पाठलाग करायचा होता. त्यांनी सांगितले की, एकदा रणवीर कपिल देव यांच्या दिल्लीतील घरी जाऊन पोहोचला. कपिल देव त्यावेळी मीटिंगमध्ये बिझी होते. रणवीर त्यांना म्हणाला होता की, तुम्ही मीटिंग करत रहा आणि त्याला तिथे बसून फक्त त्यांना ऑब्जर्व करू द्या. रणवीर हा भींतीवर बसलेल्या एखाद्या माशीसारखा आहे. यावर कपिल देव यांनी उत्तर दिलं होतं की, जर रणवीर सिंह त्यांच्या रूममध्ये बसला तर कोणतीही मीटिंग होऊ शकत नाही.
दिग्दर्शकाने केलं रणवीरच्या मेहनतीचं कौतुक
कबीर सिंहने शोदरम्यान रणवीरचं भरभरून कौतुक केलं. ते म्हणाले की, जर रणवीर सेटवर असाच आला आणि आपल्या भूमिकेवर जास्त खास काम करू शकला नाही तर तो निराश होता. त्यामुळे हा सिनेमा त्याच्यासाठी फार चॅलेंजिंग होता. ते म्हणाले की, खातो, श्वास घेतो आणि झोपतोही कॅरेक्टरसारखाच. रणवीर यादरम्यान खरंच टीमचा कॅप्टन झाला होता.