"लांब केस, वाढलेली दाढी अन् पठाणी सूट..." रणवीर सिंहच्या 'धुरंधर' सिनेमाच्या सेटवरचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 13:15 IST2025-01-02T13:10:48+5:302025-01-02T13:15:08+5:30
रणवीर पहिल्यांदाच 'उरी' दिग्दर्शक आदित्य धरसोबत काम करत आहे.

"लांब केस, वाढलेली दाढी अन् पठाणी सूट..." रणवीर सिंहच्या 'धुरंधर' सिनेमाच्या सेटवरचा व्हिडिओ व्हायरल
अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या आदित्य धरच्या (Aditya Dhar) आगामी 'धुरंधर' सिनेमाच्या शूटमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या सेटवरील काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर लीक झाले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांमध्ये सिनेमाबाबतीत आतुरता निर्माण झाली आहे. रणवीर पहिल्यांदाच 'उरी' दिग्दर्शक आदित्य धरसोबत काम करत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा अमृतसरच्या सुवर्णमंदिरातील फोटोही व्हायरल झाला.
लांब केस, वाढलेली, पिवळ्या रंगाचा पठाणी सूट अशा लूकमध्ये तो दिसत आहे. यामध्ये तो धूम्रपान करतानाही दिसत आहे. त्याच्यासोबत काही सहकलाकार आहेत. त्यांच्या हातात बंदुका दिसत आहेत. एका खास सीनचं शूटिंग सुरु आहे. तर आणखी एका फोटोत रणवीर पगडी घालून दिसत आहे. रणवीरचा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. त्याच्या या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Excited For This One 💥💥💥#RanveerSingh 's Comeback 💥pic.twitter.com/4OpA31nOYp
— NEWTON (@odisha_prabhas) January 1, 2025
गेल्यावर्षी जुलै महिन्यात रणवीर सिंहने सोशल मीडियावर सिनेमाची घोषणा केली होती. सिनेमात संजय दत्त, आर माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांचीही मुख्य भूमिका असणार आहे. रणवीर सिंह यामध्ये कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा लूक पाहून चाहत्यांना त्याच्या खिलजी लूकचीच आठवण झाली आहे. बी६२ स्टुडिओज बॅनर अंतर्गत सिनेमाची लोकेश धर आणि ज्योती देशपांडे यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. आदित्य धरची पत्नी आणि अभिनेत्री यामी गौतमही सिनेमात असणार आहे. सिनेमाची रिलीज डेट मात्र अद्याप जाहीर झालेली नाही.