आपली एक्स गर्लफ्रेंड अनुष्का शर्माच्या लग्नानंतर हे काय म्हणाला रणवीर सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 09:47 AM2017-12-28T09:47:56+5:302017-12-28T16:46:35+5:30
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीवर गेल्या काही दिवसांपासून देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. सगळ्या सेलिब्रेटी ही त्यांना सोशल मीडियावर ...
अ ुष्का शर्मा आणि विराट कोहलीवर गेल्या काही दिवसांपासून देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. सगळ्या सेलिब्रेटी ही त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. अनुष्काच्या लग्नाबाबत तिच्या एक्स बॉयफ्रेंडला प्रश्न विचारण्यात आला. रणवीरने यानेळी अनुष्काबाबत कौतुकाचे उद्गार काढले. अनुष्का आणि रणवीर सिंगने त्यांच्या करिअरची सुरुवात एकाच चित्रपटातून केली होती. तो म्हणजे यश राज बॅनर खाली तयार झालेला बँड बाजा बरात चित्रपट. शूटिंग दरम्यान ते एकमेकांच्या खूपच जवळ आल्याची त्यावेळी चर्चा झाली होती. त्यानंतर दोघांचे अफेअर सुरु झाल्याची माहिती होती. मात्र त्या दोघांनी आपले नातं कधीच स्वीकारले नाही.
फोर्ब्ज मॅग्झिनला दिलेल्या मुलाखतीत रणवीर सिंह अनुष्का बाबत बोलताना म्हणाला की, "अनुष्का किती पुढे निघून गेली, हे फारच सुखद आहे. ती एक जबरदस्त अभिनेत्री आहे. तिच्या करिअरचा ग्राफ सॉलिड आहे. स्वत:च्या हिंमतीवर ती आज या ठिकाणी पोहोचली आहे. ती स्वत:बद्दल आणि स्वत:च्या आवडीबाबत अतिशय स्पष्ट आहे. माझ्याकडून योग्यरित्या काम झालं नाही तर आदित्य चोप्रा मला अनुष्काचं उदाहरण देऊन सांगतात की, तू नालायक आहे, अनुष्काकडून काहीतरी शिक."
अनुष्का शर्मासोबतच्या नात्याबद्दल बोलताना रणवीर सिंह सांगतो की, "आजही आमच्यात दृढ मैत्री आहे. ती एक प्रामाणिक अभिनेत्री आहे."
ALSO READ : विराट कोहलीसोबत लग्न करणाऱ्या अनुष्काला मिळाली दुसरी गुड न्यूज; बनली ‘पेटा पर्सन आॅफ द ईयर’!
बँड बाजा बारात दरम्यान त्यांचे नाव एकमेकांशी जोडण्यात आले होते. त्यानंतर अनुष्काला विराट कोहलीची साथ मिळाली तर रणवीर सिंगने दीपिका पादुकोणचा हात पकडला. एक जाहिरातीच्या दरम्यान अनुष्का आणि विराटची ओळख झाली अनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर 11 डिसेंबर 2017 ला दोघं विवाह बंधनात अडकले. तर तिकडे गलियों की रासलीला रामलीलाच्या शूटिंग दरम्यान रणवीर आणि दीपिका एकमेकांच्या जवळ आले. अनेक पार्टी आणि सार्वजनिक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. मात्र त्यांनी अधिकृत्यरित्या आपले नातं कधीच स्वीकारले नाही आहे. लवकरच दोघे संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपट एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. करणानी सेनेच्या विरोधामुळे हा चित्रपट अडचणीत सापडला आहे.