Ranveer Singh : चार वर्षांपासून मी बायकोच्या घरी राहतोय, पण आता...; 119 कोटींचं घर घेतल्यावर रणवीर सिंग म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 05:41 PM2022-12-07T17:41:47+5:302022-12-07T17:42:22+5:30
Ranveer Singh, Deepika Padukone : लग्नाच्या चार वर्षानंतर रणवीरने घर खरेदी केलं आणि यासाठी तब्बल 119 कोटी रूपये मोजले. एका ताज्या मुलाखतीत रणवीर या नव्या घराबद्दल भरभरून बोलला.
Ranveer Singh Deepika Padukone buy New Apartment: रणवीर सिंग (Ranveer Singh ) व दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हे बॉलिवूडचं पॉवर कपल लवकरच नव्या घरात शिफ्ट होणार आहेत,हे तुम्ही जाणताच. काही महिन्यांपूर्वी रणवीरनं मुंबईतील वांद्रे भागात सागर रेशममध्ये एक लक्झरी आपार्टमेंट विकत घेतलं आहे. खास बात ही की, दीपवीरचं हे आपार्टमेंट शाहरुख खानच्या ‘मन्नत’ शेजारी आहे. त्यामुळे शाहरूख व दीपवीर आता एकमेकांचे शेजारी होणार आहेत. लग्नाच्या चार वर्षानंतर रणवीरने हे घर खरेदी केलं आणि यासाठी तब्बल 119 कोटी रूपये मोजले. एका ताज्या मुलाखतीत रणवीर या नव्या घराबद्दल भरभरून बोलला.
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, चार वर्षांपूर्वी दीपिका व मी लग्न केलं. लग्न झाल्यानंतर मी तिच्या घरी राहायला गेलो. गेल्या चार वर्षांपासून मी तिच्याच घरात राहतोय. पण आता आम्ही आमचं स्वत:चं घर खरेदी केलं आहे. हे आम्ही दोघांनी खरेदी केलेलं आमचं पहिलं घर आहे आणि म्हणून आमच्यासाठी जास्त खास आहे. दीपिका प्रचंड बिझी असते. मी सुद्धा माझ्या कामात बिझी असतो. पण दीपिका फार ‘घरेलू’ आहे. तिला घरात राहणं आवडतं. अनेकदा आम्ही घरीच एकमेकांबरोबर वेळ घालवणं पसंत करतो. हे नवं घर आम्हा दोघांसाठी परफेक्ट आहे. दीपिका स्वत: घर सजवते आहे. एखादी लहान मुलगी तिचं डॉल हाऊस सजवते, अगदी तशी दीपिका घर सजवते आहे. मी तिला यावरून अनेकदा चिडवतो सुद्धा.तिच्यासोबत या घरात राहणं, तिच्यासोबत क्वालिटी टाईम घालवणं मला आवडेल.
दीपवीरचं नवं घर सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट आणि शाहरुखच्या मन्नत बंगल्या जवळ आहे. 11 हजार 266 चौरस फूटात असलेलं हे अपार्टमेंट चार मजल्यांचं आहे. 16 व्या, 17 व्या, 18 व्या आणि 19 व्या माळ्यावरच्या या घरासाठी रणवीरला 18 पार्किंग स्लॉट मिळाले आहेत. या घरासाठी रणवीरने महसूल विभागाला 7 कोटी 13 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरलं आहे.