रणवीर सिंगने शेअर केला दीपिका पादुकोणचा व्हिडिओ, हा व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 11:23 AM2020-02-15T11:23:49+5:302020-02-15T11:24:44+5:30

रणवीर सिंगने दीपिका पादुकोणचा शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Ranveer Singh shared Deepika Padukone's video, this video is going viral | रणवीर सिंगने शेअर केला दीपिका पादुकोणचा व्हिडिओ, हा व्हिडिओ होतोय व्हायरल

रणवीर सिंगने शेअर केला दीपिका पादुकोणचा व्हिडिओ, हा व्हिडिओ होतोय व्हायरल

googlenewsNext


बॉलिवूडचा गली बॉय म्हणजेच अभिनेता रणवीर सिंगचा गली बॉय चित्रपट गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीला प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन झोया अख्तरने केले आहे. एका सामान्य घरातील मुलगा आपल्या चिकाटी व जिद्दीच्या जोरावर यश संपादन करतो,त्याचा प्रवास गली बॉय चित्रपटात रेखाटण्यात आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती.

गली बॉय चित्रपटाशिवाय या चित्रपटातील 'अपना टाईम आयेगा' हे गाणं तर खूप लोकप्रिय ठरले. या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. याच निमित्ताने अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या शैलीत 'अपना टाईम आयेगा' हे गाणं सादर केलं आहे. 


दीपिकाचा हटके अंदाजातील हा व्हिडिओ अभिनेता आणि पती रणवीर सिंगने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. 

दीपिका आणि रणवीर लवकरच '८३' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटामध्ये रणवीर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे.

तर कपिल देव यांची पत्नी रोमीच्या भूमिकेत दीपिका दिसणार आहे. हा चित्रपट १० एप्रिल, २०२० ला प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात रणवीर आणि दीपिका शिवाय चित्रपटात साकिब सलीम, आदिनाथ कोठारे, चिराग पाटिल, हार्डी संधू, ऐमी विर्क, जतिन सरना, पंकज त्रिपाठी, ताहिर राज भसीन, दिनकर शर्मा, जीवा, साहिल खट्टर, धैर्य करवा, निशांत दहिया आणि आर बद्री देखील भूमिका साकारणार आहे.

Web Title: Ranveer Singh shared Deepika Padukone's video, this video is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.