बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 08:59 AM2024-09-30T08:59:28+5:302024-09-30T08:59:54+5:30

लेकीच्या जन्मानंतर रणवीर सिंह पहिल्यांदाच सर्वांसमोर आला.

Ranveer Singh shares his happiness with paparazzi says baap ban gaya re | बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना

बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना

अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) काही दिवसांपूर्वीच मुलीला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर दोन्ही कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. वयाच्या ३८ व्या वर्षी दीपिका आई झाली. तर बाबा झाल्याने रणवीर सिंहचा (Ranveer Singh) आनंद गगनात मावेनासा झालाय. नुकत्याच एका इव्हेंटमध्ये रणवीर सिंहने माध्यमांसमोर पहिल्यांदाच बाबा झाल्याचा आनंद जाहीररित्या दाखवला.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी काल मुंबईत ऑलिम्पिक पदक विजेत्यांसाठी कौतुक सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी रणवीर सिंह देखील आला होता. लेकीच्या जन्मानंतर रणवीर सिंह पहिल्यांदाच सर्वांसमोर आला. थ्री पीस सूट, गोल्डन चश्मा आणि आकर्षक बिअर्ड अन् हेअरस्टाईल अशा लूकमध्ये तो हँडसम दिसत होता. यावेळी त्याने माध्यमांसमोर पोज दिली. नंतर पापाराझींसोबत हात मिळवण्यासाठी गेला आणि म्हणाला, 'बाप बन गया रे!'


रणवीर सिंहचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. चाहते त्याचं भरभरुन कौतुक करत आहेत. 'डॅशिंग डॅड', 'फेवरेट फॉरेवर', 'बाबा झालो- किती क्युट बोलतोय' अशा कमेंट्स करत रणवीरला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दीपिकाने ८ सप्टेंबर रोजी लेकीला जन्म दिला. लग्नानंतर सहा वर्षांनी रणवीर-दीपिका आई बाबा झाले आहेत. सध्या दीपिकाचं रुटीनच बदलल्याचं तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलं होतं. 'फीड, बर्प, स्लीप, रिपीट' असं तिने आपल्या इन्स्टाग्राम बायोवर लिहिले. 

रणवीर सिंहचा 'सिंघम अगेन' सिनेमा दिवाळीत रिलीज होणार आहे. यामध्ये दीपिका पदुकोणचीही भूमिका आहे. रोहित शेट्टीच्या  या सिनेमासाठी चाहते उत्सुक आहेत.
 

Web Title: Ranveer Singh shares his happiness with paparazzi says baap ban gaya re

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.