'गली बॉय'नंतर रणवीर सिंगने सुरु केले 'या' सिनेमाचे शूटिंग, शेअर केला 'हा' फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 05:40 PM2019-01-14T17:40:02+5:302019-01-14T17:44:40+5:30

रणवीर सिंगचा आगामी सिनेमा  '८३'  गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे.'८३'  या सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे.

Ranveer Singh Start Shooting For 83 Movie Which Is Based On 1983 Indian Worldcup | 'गली बॉय'नंतर रणवीर सिंगने सुरु केले 'या' सिनेमाचे शूटिंग, शेअर केला 'हा' फोटो

'गली बॉय'नंतर रणवीर सिंगने सुरु केले 'या' सिनेमाचे शूटिंग, शेअर केला 'हा' फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देया सिनेमात  रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता

रणवीर सिंगचा आगामी सिनेमा  '८३'  गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे.'८३'  या सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. दिग्दर्शक कबीर खान या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमात  रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. या सिनेमासाठी रणवीर सिंगने खुद्द कपिल देव यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. 
रणवीर सिंगने त्याच्या अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटाला त्यांने ‘८३ च्या सुंदर प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली’ असे कॅप्शन सुद्धा दिले आहे. 


काही दिवसांपूर्वी या सिनेमात रणवीर सिंगसोबत दीपिका पादुकोणदेखील झळकणार असल्याची चर्चा होती. कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका दीपिकाला ऑफर करण्यात आल्याची माहिती होती. निर्मात्यांनी या चित्रपटात दीपिका कपिल देवची पत्नी रोमीची भूमिका करण्यासाठी विचारले व निर्मात्यांच्या नुसार दीपिका हे काम एका आठवड्यात पूर्ण करू शकते. मात्र दीपिका पादुकोणच्या जवळच्या सूत्रांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार, सध्या दीपिकाची बॉक्स ऑफिसवर असलेल्या ब्रॅण्ड व्हॅल्यूनुसार ती स्पेशल अपियरन्स करू शकणार नाही.  


रणवीर सिंगबाबत बोलायचे झाले तर फारच कमी कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये अभिनयाची जोरदार बॅटिंग केली असून आता '८३' चित्रपटामध्ये काय कमाल दाखवणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Ranveer Singh Start Shooting For 83 Movie Which Is Based On 1983 Indian Worldcup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.