प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने माझ्या मागे कुत्रा सोडला; Ranveer Singh चा धक्कादाय खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 07:25 PM2022-11-14T19:25:43+5:302022-11-14T19:27:55+5:30

Ranveer Singh Story: रणवीर सिंगने एका मुलाखतीत त्याच्या संघर्षाच्या दिवसांवर प्रकाश टाकला. यावेळी त्याने तो एक धक्कादायक खुलासाही केला.

Ranveer Singh: The famous filmmaker left his dog after me; Ranveer Singh's shocking revelation | प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने माझ्या मागे कुत्रा सोडला; Ranveer Singh चा धक्कादाय खुलासा

प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने माझ्या मागे कुत्रा सोडला; Ranveer Singh चा धक्कादाय खुलासा

googlenewsNext

Ranveer Singh: 'बँड बाजा बारात' या चित्रपटापासून रणवीर सिंगने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पहिल्या चित्रपटापासून ते आजपर्यंत रणवीर एक विश्वासार्ह अभिनेता बनला आहे. नुकतच त्याने मोरोक्को येथील मॅराकेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. यावेळी रणवीरने त्याच्या बॉलिवूड प्रवासावर प्रकाश टाकला.  

निर्मात्याने मागे कुत्रा सोडला
डेडलाईनमधील वृत्तानुसार, रणवीरने एका मुलाखतीत त्याच्या बॉलिवूड डेब्यूपूर्वीच्या संघर्षमय दिवसांवर भाष्य केले. त्याने सांगितले की, एका प्रसिद्ध निर्मात्याने(जो आता हयात नाही) त्याच्या मनोरंजनासाठी एका खाजगी पार्टीत रणवीर सिंगच्या मागे आपला कुत्रा सोडला होता. विशेष म्हणजे, त्या निर्मात्याने स्वतः रणवीरला पार्टीत बोलावले होते. रणवीरने त्या निर्मात्याचे नाव सांगण्यास नकार दिला.

कास्टिंग काउचचा बळी
या सेशनमध्ये रणवीर सिंगने त्या काळातील कास्टिंग काउचचा अनुभवही सांगितला. तो म्हणाला की एक माणूस मला एका ठिकाणी बोलावतो आणि विचारतो, तू मेहनती आहेस की हुशार?. मी स्वतःला हुशार समजत नाही, त्यामुळे मी त्याला म्हणालो की, मी एक मेहनती व्यक्ती आहे. तर तो मला म्हणाला डार्लिंग, बी स्मार्ट, बी सेक्सी. त्या साडेतीन वर्षात असे सर्व प्रकारचे अनुभव आले आणि मला वाटते की हाच तो काळ होता, ज्याने मला घडवलं, अशी आठवण रणवीरने करुन दिली.

Web Title: Ranveer Singh: The famous filmmaker left his dog after me; Ranveer Singh's shocking revelation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.