फोटोत दिसणारा हा क्युट चिमुकला आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार! घेतो कोट्यवधींची फी, ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 08:00 AM2023-07-06T08:00:00+5:302023-07-06T08:00:02+5:30

फोटोत दिसणार्‍या या मुलाने अभिनयाच्या जगात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. भल्याभल्यांमना त्याला ओळखणं कठीण जातंय.

Ranveer singh unseen childhood photo viral on social media did you recognize | फोटोत दिसणारा हा क्युट चिमुकला आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार! घेतो कोट्यवधींची फी, ओळखलंत का?

फोटोत दिसणारा हा क्युट चिमुकला आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार! घेतो कोट्यवधींची फी, ओळखलंत का?

googlenewsNext

सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होणे ही काही नवीन गोष्ट नाही. पण आजही फोटो पाहून चाहते सोशल मीडियावर भरभरून कमेंट करत असतात. व्हायरल होत असणाऱ्या फोटोतील आपल्या आवडत्या स्टारला ओळखण्यासाठी अनेक अंदाजही लावतात. आता अशा स्टारचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याला ओळखणं खरोखर कठीण जातंय. पण या फोटोत दिसणाऱ्या मस्तीखोर मुलाला तुम्ही ओळखू शकता का?

फोटोमध्ये दिसणार्‍या या मुलाची खास गोष्ट म्हणजे या मुलाने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं प्रस्थ निर्माण केलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, या मुलाने बॉक्स ऑफिसवर एकाहुन एक हिट सिनेमा दिले आहेत. या चिमुकल्याचे सिनेमे कोट्यवधींचा गल्ला जमावतात. याची पत्नीही बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेंत्री पैकी एक आहे. 

एवढ्या हिंटनंतर तुम्ही या चिमुकल्याला ओळखलं असेल. नसेल ओळखलं तर आम्ही सांगतो हा बॉलिवूडचा सर्वात हँडसम हंक रणवीर सिंगचा फोटो आहे. जो आज आपल्या जबरदस्त स्टाइलने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. आज रणवीर आपला 38 वा वाढदिवस साजरा करतो आहे.रणवीर सिंग आणि त्याची दीपिका पादुकोण बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहे. 'रामलीला' चित्रपटाच्या सेटवर दोघांमधली जवळीक वाढू लागली. रणवीर दीपिकाच्या प्रेमात पडला आणि दोघांनीही लग्न केले. रणवीर सिंग बॉलिवूडमधील त्याच्या चित्रपटांसाठी तसेच त्याच्या फॅशनेबल ड्रेसिंग स्टाइलसाठी ओळखला जातो.

काही काळापासून रणवीर सिंगचे चित्रपट फारसे कमाल दाखवू शकले नाहीत. लवकरच त्याला आलिया भटसोबत  रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  याशिवाय तो बैजू बावरा या चित्रपटातही दिसणार आहे.
 

Web Title: Ranveer singh unseen childhood photo viral on social media did you recognize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.