रणवीर सिंग लंडनमध्ये करतोय सेलिब्रेशन, वाचा त्यामागचे काय आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 05:34 PM2019-08-31T17:34:13+5:302019-08-31T17:34:19+5:30
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड स्टार रणवीर सिंग त्याचा आगामी 'सिनेमा 83'च्या शूटिंगमध्ये लंडनमध्ये बिझी होता.
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड स्टार रणवीर सिंग त्याचा आगामी 'सिनेमा 83'च्या शूटिंगमध्ये लंडनमध्ये बिझी होता. या चित्रपटामध्ये तो भारताच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कपिल देव यांच्या भूमिकेसाठीही रणवीर प्रचंड मेहनत घेत आहे. एवढंच नाहीतर या भूमिकेसाठी त्याने आपल्या आवडत्या अनेक गोष्टींचा त्यागही केला आहे.
रणवीरने लंडनमध्ये 83मध्ये पहिले शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केल्याची माहिती इन्स्टाग्रामवरुन दिली आहे. ज्यात तो चीअर्स करताना दिसतोय.
या सिनेमात ती दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांच्या भूमिका साकारणार आहे. लग्नानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा हा पहिला सिनेमा आहे. '८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता.
या चित्रपटात ताहिर राज भसीन सुनील गावस्करांच्या भूमिकेत, एमी ब्रिक बलविंदर संधूंच्या भूमिकेत, तमीळ अभिनेता जीवा कृष्णामचारी श्रीकांत यांच्या भूमिकेत, चिराग पाटील संदीप पाटील यांच्या भूमिकेत, आदिनाथ कोठारे दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत, धैर्य करवा रवी शास्त्री यांच्या भूमिकेत आणि साहिल खट्टर सैयद यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना १० एप्रिल २०२० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.