'धुरंधर'च्या सेटवरुन समोर आला रणवीर सिंगचा ढासू लूक, त्याच्या लूकची 'ॲनिमल'शी होतेय तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:29 IST2025-01-02T16:29:03+5:302025-01-02T16:29:42+5:30

Ranveer Singh : 'धुरंधर' चित्रपटाच्या सेटवरून रणवीर सिंगचा लूक समोर आला आहे, जो पाहून चाहते हैराण झाले आहेत.

Ranveer Singh's Dhasu look revealed from the sets of 'Dhurandhar', his look is being compared to 'Animal' | 'धुरंधर'च्या सेटवरुन समोर आला रणवीर सिंगचा ढासू लूक, त्याच्या लूकची 'ॲनिमल'शी होतेय तुलना

'धुरंधर'च्या सेटवरुन समोर आला रणवीर सिंगचा ढासू लूक, त्याच्या लूकची 'ॲनिमल'शी होतेय तुलना

बॉलिवूडचा सिंबा म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) सातत्याने वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असतो. 'सिंघम अगेन' (Singham Again Movie) चित्रपटानंतर तो अद्याप कोणत्या सिनेमात दिसला नाही. या चित्रपटात अभिनेत्याचा कॅमिओ होता, त्यामुळे चाहते अभिनेत्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि ही प्रतीक्षा देखील लवकरच संपणार आहे. सध्या रणवीर सिंग त्याच्या आगामी 'धुरंधर' (Dhurandhar Movie) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, ज्यासाठी त्याने त्याच्या लूकमध्ये बरेच बदल केले आहेत. दरम्यान आता 'धुरंधर' चित्रपटाच्या सेटवरून रणवीर सिंगचा लूक समोर आला आहे, जो पाहून चाहते हैराण झाले आहेत. रणवीरच्या या नव्या लूकने चाहत्यांना रणबीर कपूरचा ॲनिमल आणि शाहरुख खानच्या पठाणची आठवण करून दिली आहे.

२०२४ मध्ये रणवीर सिंगचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही आणि त्यामुळेच रणवीरचे चाहते थोडे निराश झाले आहेत, मात्र लवकरच अभिनेता धुरंधर या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. रणवीर सध्या या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. निर्मात्यांनी चित्रपटाशी संबंधित जास्त माहिती दिलेली नाही, परंतु सेटवरून समोर आलेल्या रणवीरच्या लूकने चाहत्यांना चकित केले आहे. सेटवरून लीक झालेल्या फोटोंमध्ये रणवीर सिंग लांब दाढी, सूट-बूट आणि डोक्यावर मोठी पगडी घातलेला दिसत आहे. याशिवाय सेटवरून एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये रणवीर लांब केस, दाढी आणि कुर्ता पायजमा घालून उभा आहे आणि टफ लूक देत आहे. व्हिडिओमध्ये तो इकडे तिकडे फिरत असताना सिगारेट ओढताना दिसत आहे. रणवीरचा हा लूक चाहत्यांना भावला  आहे.

'धुरंधर'मधील रणवीर सिंगच्या लूकचे होतंय कौतुक
सोशल मीडियावर रणवीर सिंगच्या या लूकवर प्रतिक्रिया देण्यापासून चाहते स्वत:ला रोखू शकत नाहीत. त्याला या अवतारात पाहून चाहत्यांना रणबीर कपूरचा ॲनिमल आणि शाहरुख खानचा पठाण आठवतोय. रणबीर आणि शाहरुखनेही त्यांच्या चित्रपटासाठी त्यांचा लूक पूर्णपणे बदलला होता. ॲनिमलमध्ये रणबीर कपूरचा लांब केस, दाढी आणि मोठे पोट असा लूक होता. तर दुसरीकडे शाहरुखने आपल्या फिट बॉडीने सर्वांना प्रभावित केले होते. मात्र, काही युजर्सचा असा विश्वास आहे की रणवीरने त्याच्या धुरंधर चित्रपटात रणबीर कपूरचा ॲनिमलमधला लूक कॉपी केला आहे. तर काहींचे म्हणणे आहे की ते त्याच्या लूकसोबतच स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title: Ranveer Singh's Dhasu look revealed from the sets of 'Dhurandhar', his look is being compared to 'Animal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.