रणवीर सिंगचा 'पद्मावती' तोडणार का प्रभासच्या 'बाहुबली'चा रेकॉर्ड ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 12:20 PM2017-09-13T12:20:53+5:302017-09-13T17:51:46+5:30

बाहुबली चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. मात्र बाहुबलीचा रेकॉर्ड मोडायला बॉलिवूडचा एक बिग बजेट चित्रपट तयार आहे. हो ...

Ranveer Singh's 'Padmavati' will break the record of 'Prabhas' Bahubali? | रणवीर सिंगचा 'पद्मावती' तोडणार का प्रभासच्या 'बाहुबली'चा रेकॉर्ड ?

रणवीर सिंगचा 'पद्मावती' तोडणार का प्रभासच्या 'बाहुबली'चा रेकॉर्ड ?

googlenewsNext
हुबली चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. मात्र बाहुबलीचा रेकॉर्ड मोडायला बॉलिवूडचा एक बिग बजेट चित्रपट तयार आहे. हो तुम्ही बरोबर वाचलात प्रभासच्या बाहुबलीचा  रेकॉर्ड मोडायला संजय लीला भंसाळींचा पद्मावती हा चित्रपट तयार आहे. चित्रपटाच्या शूटिंगचे काही सीन्स बाकी आहे त्यानंतर चित्रपट रिलीजसाठी तयार असेल. पद्मावतीची शूटिंग सुरु व्हायला उशीर झाल्याने चित्रपट रिलीज होण्यासाठी विलंब होतो आहे. याआधी हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार होता मात्र चित्रपटाचे काम बाकी असल्याने आता तो फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार आहे. पद्मावती चित्रपट हा बाहुबलीला टक्कर देण्याची क्षमता ठेवतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे.  रिलीज आधीच या चित्रपटाने एक नवा रेकॉर्ड तयार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पद्मावती 500 पेक्षा जास्त थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे आणि 8 हजार स्क्रिनवर दिसणार आहे. चित्रपटाचा बजेट जवळपास 175 कोटींचा आहे. चित्रपटाच्या क्लाइमैक्स सीनवर जवळपास 12 कोटी खर्च करण्याचा प्लॉन आहे. 

ALSO READ : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचा अनुष्का शर्माशी होणार बॉक्स ऑफिसवर सामना !


यात दीपिका पादुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. राणी पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका दिसणार आहे तर अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत रणवीर आणि शाहिद कपूर चित्तौडचा राजा रावल रत्न सिंगच्या भूमिकेत झळकणार आहे. शाहिदने ही भूमिका साकारण्यासाठी सहा प्रकारच्या तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले आहे. ‘पद्मावती’ चित्रपट चितौडगढची राणी पद्मिनी आणि बादशाह अलाउद्दीन खिलजी यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे.  यात काम करण्यासाठी दीपिका आणि शाहिदला 10 कोटींचे मानधन मिळाले आहे तर रणवीरला 13 कोटींचे. याचित्रपटानंतर दीपिकाने आपल्या मानधनात वाढ केल्याच्या ही बातम्या आल्या होत्या.  चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी थेट लंडन गाठले आहे.  संजय लीला भंसाळी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी हा एक चित्रपट आहे. यानंतर ते गुस्ताखियाँ चित्रपटाच्या तयारी लागणार आहेत. यातून साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांची प्रेमकथा मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे.       

Web Title: Ranveer Singh's 'Padmavati' will break the record of 'Prabhas' Bahubali?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.