आला रे आला 'सिंबा' आला! 'सिंघम अगेन'मध्ये ॲक्शन करताना दिसणार संग्राम भालेराव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 01:52 PM2023-10-30T13:52:02+5:302023-10-30T13:54:50+5:30

चाहत्यांची उत्कंठा वाढवत 'सिंघम अगेन'मधील रणवीर सिंगचा फर्स्ट लूकही समोर आला आहे.

Ranveer Singh's rowdy look in Singham Again | आला रे आला 'सिंबा' आला! 'सिंघम अगेन'मध्ये ॲक्शन करताना दिसणार संग्राम भालेराव

आला रे आला 'सिंबा' आला! 'सिंघम अगेन'मध्ये ॲक्शन करताना दिसणार संग्राम भालेराव

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने बहुचर्चित ‘सिंघम’ सीरिजमधील आणखी 'सिंघम अगेन' चित्रपटाची घोषणा केली आहे.  'सिंघम अगेन'मध्ये टायगर श्रॉफपासून ते अक्षय कुमारपर्यंत रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणही दमदार अॅक्शन सीन करताना दिसणार आहेत. नुकतेच या चित्रपटातील सॉलिड अॅक्शन सीन्सचे फोटो समोर आले आहेत. आता चाहत्यांची उत्कंठा वाढवत 'सिंघम अगेन'मधील रणवीर सिंगचा फर्स्ट लूकही समोर आला आहे.

 रणवीर पुन्हा एकदा सिंबाच्या भुमिकेतून रांगड्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. रणवीरने  'सिंघम अगेन'मधील त्याचा लूकचे पोस्टर रीलिज केलं आहे. पोस्ट शेअर करत त्यानं कॅप्शन दिलं, 'सबसे नटखट सबसे निराला आला रे आला सिंबा आला'. या फोटोमध्ये रणवीर सिंग खाकी वर्दीत रावडी अंदाजात दिसतोय. तर तर फोटोत रणवीरच्या मागे बजरंगबलीची मुर्ती आणि पोलिस व्हॅन दिसतेय.

'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगण, करीना कपूर, रणवीर सिंग, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग आणि दीपिका अशी  तगडी स्टारकास्ट आहे. पहिल्यांदाच दीपिका पदुकोण ‘लेडी सिंघम’ म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये शक्ती शेट्टी ही भूमिका ती साकारणार आहे.  त्यामुळे सिंघम अगेन निमित्ताने रणवीर - दीपिका पुन्हा एकत्र पाहायला मिळणार आहेत. 

अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला 'सिंघम'चित्रपट चांगलाच गाजला होता.  'सिंघम' हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग ‘सिंघम २’लाही प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाचा तिसरा भाग ‘सिंघम अगेन’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सिंघम अगेन'बाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २०२४ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 


 

Web Title: Ranveer Singh's rowdy look in Singham Again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.