रणवीर सिंगवर का आली मुंबईत लोकलमध्ये जाण्याची वेळ ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 07:23 AM2018-03-27T07:23:40+5:302018-03-27T12:53:40+5:30
रणवीर सिंगला मुंबईतली लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमध्ये बघण्यात आले. रणवीर जोया अख्तरचा गली बॉय चित्रपटाच्या शूटिंगसाठी इथे आला ...
र वीर सिंगला मुंबईतली लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमध्ये बघण्यात आले. रणवीर जोया अख्तरचा गली बॉय चित्रपटाच्या शूटिंगसाठी इथे आला होता. मुंबईतल्या लोकलमध्ये या चित्रपटाचा एक सीन शूट करण्यात आला.
हा सीन रविवारी शूट करण्यात आला ज्यावेळी लोकलमध्ये फारशी वर्दळ नसते. रोजच्या यात्रेकरुना त्रास होऊ नये म्हणून शूट रविवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा सीन शूट करण्यासाठी दोन तासांचा अवधी लागला. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर ट्रेनला चर्चगेट स्टेशनवरुन बाहेर काढण्यात आले. या चित्रपटात रणवीर सिंगच्या अपोझिट आलिया भट्ट दिसणार आहे. रणवीर व आलिया या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. ‘गली बॉय’मध्ये एका स्ट्रिट रॅपरची कथा असल्याचे कळतेय. जी एका रिअल लाईफ स्टोरीवर बेतलेली आहे. ही कथा गेल्या अनेक वर्षांपासून जोयाच्या डोक्यात होत्या. या चित्रपटासाठी आधी रणबीर कपूरचे नाव चर्चेत होते. यानंतर वरूण धवनच्या नावाचीही चर्चा झाली आणि सरतेशेवटी रणवीरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. या चित्रपटात रणवीर व आलिया यांच्यासोबतच अभिनेत्री कल्की कोच्लिन ही सुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. चर्चा खरी मानाल तर कल्की यात एका रॅपरच्या भूमिकेत दिसेल.
गली बॉयनंतर रणवीर सिम्बाच्या शूटिंगला लागणार आहे. ‘सिम्बा'मध्ये रणवीरसोबत सारा अली खान दिसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘सिम्बा’साठी हिरोईनचा शोध सुरू होता. यादरम्यान अनेक अभिनेत्रींच्या नावांची चर्चा झाली. सर्वप्रथम जान्हवी कपूरने ‘सिम्बा’ साईन केल्याची बातमी आली. नंतर इंटरनेट सेन्सेशन व मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर या चित्रपटात दिसणार, अशी चर्चा रंगली. पण आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण आता या चित्रपटात साराची वर्णी लागली आहे. ‘सिम्बा’मध्ये रणवीर सिंग संग्राम भालेराव या पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारताना दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’हा सिनेमा तेलगू चित्रपट ‘टेंपर’चा रिमेक आहे. पण रोहित शेट्टीचे मानाल तर हा पूर्णपणे ‘टेपर’चा रिमेक नसेल. केवळ २० टक्के भाग ‘टेंपर’मधून घेतला जाईल. उर्वरित चित्रपट बॉलिवूड प्रेक्षकांना डोळ्यांपुढे ठेवून बनवला जाईल.