"मला स्वत:ची लाज वाटते", अयोध्येतील राम मंदिराला विरोध केल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्याची जाहीर माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 02:35 PM2023-12-31T14:35:40+5:302023-12-31T14:36:14+5:30
बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीने राम मंदिरबाबत केलेल्या विधानामुळे माफी मागितली आहे. रणवीरने याबाबत एक ट्वीट केलं आहे.
अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनासाठी सगळे उत्सुक आहेत. राम मंदिर उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू असताना प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने जाहीर माफी मागितली आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीने राम मंदिरबाबत केलेल्या विधानामुळे माफी मागितली आहे. रणवीरने याबाबत एक ट्वीट केलं आहे.
"अयोध्या राम मंदिराच्या जागी स्मारक किंवा हॉस्पिटल बनवू इच्छिणाऱ्या काही हिंदूंपैकी मीदेखील एक होतो. ज्यामुळे आपल्या समाजात अनेक काळापासून संघर्ष संपतील. पण, आज यासाठी मला स्वत:ची लाज वाटत आहे. शांतीसाठी मी धर्म आणि धार्मिकतेचं बलिदान द्यायला निघालो होतो. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या मूल्यांवर मी ठाम राहिलो नाही याबाबत मला लाज वाटत आहे," असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
I was one of the many Hindus who were willing to sacrifice the temple at #Ayodhya, and have a monument or hospital in its place, just so we can end this long standing conflict between the communities. Today I feel ashamed that I was willing to sacrifice righteousness at the altar…
— Ranvir Shorey (@RanvirShorey) December 30, 2023
पुढे रणवीर म्हणतो, "सत्य आणि न्यायासाठी ही कठीण लढाई लढणाऱ्या सगळ्यांचं मी अभिनंद करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. मी भगवान राम यांच्याकडे माफी मागतो आणि मला सुद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना करतो. आपल्या या भूमीवर धर्म कायम रहावा आणि सगळ्या भारतीयांच्या जीवनात शांती, समृद्धी यावी यासाठी मी प्रार्थना करतो. जय श्री राम." रणवीरच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. कंगनाने रणवीरचं हे ट्वीट लाइक केलं आहे. तर अनुपम खेर यांनी 'जय श्री राम' असं लिहिलं आहे.