Bigg Boss OTT 3: 'माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं स्कँडल', पूजा भटविषयी काय म्हणाला रणवीर शौरी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 05:08 PM2024-07-04T17:08:39+5:302024-07-04T17:10:43+5:30

आयुष्यातील सर्वात मोठ्या स्कँडलचा सामना करावा लागला.

Ranvir Shorey Bigg Boss OTT 3 says The biggest scandal of my life was with an actress | Bigg Boss OTT 3: 'माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं स्कँडल', पूजा भटविषयी काय म्हणाला रणवीर शौरी?

Bigg Boss OTT 3: 'माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं स्कँडल', पूजा भटविषयी काय म्हणाला रणवीर शौरी?

बिग बॉस ओटीटी सीझन 3 (Bigg Boss OTT 3) मध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीने (Ranvir Shorey) सहभाग घेतल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. रणवीर शौरीने सलमान खानसोबत 'एक था टायगर' मध्ये काम केले होते. याशिवाय त्याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. नुकतंच त्याने बिग बॉसच्या घरात पूजा भटबाबत खुलासा केला जेव्हा दोघंही रिलेशनशिपमध्ये होते. पूजासोबत ब्रेकअपवर तो काय म्हणाला?

रणवीर शौरी म्हणाला, "२००२ साली लडाखमध्ये 'लक्ष्य'च्या शूटिंगवेळी मला घरुन फोन आला. माझ्या आईची तब्येत बिघडली होती. शूट संपत नाही तोवर मला तिथून निघता येणार नव्हतं. काही दिवसांनंतर आईचं निधन झालं. माझ्यासाठी तो मोठा धक्का होता. त्याच वेळी मला एका अभिनेत्रीसोबत आयुष्यातील सर्वात मोठ्या स्कँडलचा सामना करावा लागला. मला तेव्हा माझ्या भावाने अमेरिकेला चल सांगितलं. मी 6 महिने अॅक्टिंग कोर्स केला आणि भावाकडून पैसे उधार घेतले."

तोो पुढे म्हणाला,  "तिथून परतल्यावर 2005 साली 'द ग्रेट इंडियन कॉमेडी शो'ची सुरुवात केली. तेव्हाच दोन मोठे सिनेमे जे बराच काळ प्रदर्शित झाले नव्हते ते रिलीज झाले आणि हिटही झाले. तेव्हा मला वाटलं की माझं आयुष्य एक अभिनेता म्हणून सेट झालं आहे."

रणवीर शौरीसोबत ब्रेकअपनंतर पूजा भटने मनीष मखिजासोबत लग्न केले. मात्र नंतर त्यांचा घटस्फोट झाला. तर रणवीरने 2010 साली कोंकणा सेन शर्मासोबत लग्नगाठ बांधली. त्यांना 2011 साली मुलगाही झाला. मात्र 2015 साली कोंकणासोबत त्याचा घटस्फोट झाला.

Web Title: Ranvir Shorey Bigg Boss OTT 3 says The biggest scandal of my life was with an actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.