रणवीर शौरी म्हणतो, बॉलिवूडमध्ये प्रचंड राजकारण, यशस्वी होणे सोपे नाही !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 10:44 AM2019-03-01T10:44:22+5:302019-03-01T10:46:33+5:30
काळासोबत रणवीर शौरीने एक प्रतिभाशाली अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक ओळख निर्माण केली. पण याऊपरही आपल्या १५ वर्षांच्या करिअरमध्ये रणवीरला बॉलिवूडमध्ये म्हणावे तसे यश मिळवता आले नाही.
ठळक मुद्देसोनचिडिया या आज प्रदर्शित झालेल्या चित्रपटात रणवीर एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. सुशांत सिंग राजपूत यात लीड रोलमध्ये आहे.
रणवीर शौरीने सन २००२ मध्ये ‘एक छोटी सी लव स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. पण रणवीरचा हा पहिलाच चित्रपट बॉक्सआॅफिसवर फ्लॉप ठरला. अर्थात काळासोबत रणवीरने एक प्रतिभाशाली अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक ओळख निर्माण केली. पूजा भट्टचा ‘जिस्म’, दिबाकर बॅनर्जीचा ‘खोसला का घोंसला’ आणि अलीकडे रिलीज झालेल्या ‘तितली’ या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. अर्थात याऊपरही आपल्या १५ वर्षांच्या करिअरमध्ये रणवीरला बॉलिवूडमध्ये म्हणावे तसे यश मिळवता आले नाही.
अलीकडे रणवीर या सगळ्यांवर बोलला. बॉलिवूडचे बडे दिग्दर्शक माझ्याकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप त्याने या मुलाखतीत केला. बॉलिवूडमध्ये प्रचंड राजकारण आहे. दिसायला ही इंडस्ट्री अतिशय ग्लॅमरस व सुंदर दिसते. पण वास्तव काही वेगळेच आहे. तुमच्याबद्दल इथे लोक काय विचार करतात, यावरून बडे दिग्दर्शक, निर्माते स्वत:ची मते ठरवतात आणि यावर तुमचे करिअर अवलंबून असते. त्यामुळे इथे यशस्वी होणे सोपे नाही. याचमुळे माझे करिअर प्रभावित झाले. अनेकांनी मला टाळले, माझ्याकडे दुर्लक्ष केले, असे रणवीर म्हणाला.
सोनचिडिया या आज प्रदर्शित झालेल्या चित्रपटात रणवीर एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. सुशांत सिंग राजपूत यात लीड रोलमध्ये आहे. त्याच्याशिवाश भूमी पेडणेकर, आशुतोष राणा, मनोज वाजपेयी अशा दिग्गज कलाकारांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तूर्तास समीक्षकांनी सोनचिडिया या चित्रपटाला मनापासून दाद दिली आहे. माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर हा चित्रपट चांगला बिझनेस करेल, असे जाणकारांचे मत आहे. हा चित्रपट चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोरांच्या आयुष्यावर आधारित आहे.