रणवीर सिंह कबीर खानसोबत खेळणार ‘क्रिकेट’!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2016 01:14 PM2016-11-15T13:14:27+5:302016-11-15T13:14:27+5:30

होय, तुम्ही ऐकता ते खरे आहे. सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान लवकरच रणवीर सिंह याच्यासोबत ...

Ranvir Singh will play with Kabir Khan 'cricket'! | रणवीर सिंह कबीर खानसोबत खेळणार ‘क्रिकेट’!

रणवीर सिंह कबीर खानसोबत खेळणार ‘क्रिकेट’!

googlenewsNext
य, तुम्ही ऐकता ते खरे आहे. सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान लवकरच रणवीर सिंह याच्यासोबत काम करताना दिसणार आहेत. कबीर खान सध्या ‘ट्युबलाईट’मध्ये बिझी आहेत. याचे काम संपताच  रणवीरसोबत एका नव्या प्रोजेक्टवर ते काम सुरु करणार असल्याची बातमी आहे. यावर्षाच्या अखेरिस वा नव्या वर्षाच्या सुरुवातीला या चित्रपटाचे शूटींग सुरु होणे अपेक्षित आहे.   बºयाच दिवसांपासून कबीर खान ‘अजहर’, ‘एम एस धोनी-दी अनटोल्ड स्टोरी’ या शृंखलेतील क्रिकेट या विषयाला वाहिलेला चित्रपट घेऊन येणार अशी चर्चा होती. अखेर ही चर्चा सत्यात उतरताना दिसते आहे.  सन १९८३मध्ये भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या या संघाने भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. हीच विजयगाथा पडद्यावर दिसणार असून कबीर खान हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीरने या चित्रपटासाठी होकार कळवला आहे. रणवीर सध्या संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे. ‘पद्मावती’चे शूटींग हातावेगळे केल्यानंतर तो या चित्रपटाचे शूटींग सुरु करण्याची शक्यता आहे. एकंदर काय तर, कबीर यांच्या आगामी चित्रपटात रणवीर कपिल देवची भूमिका साकारताना दिसणार आहे.  
या चित्रपटात भारतीय संघाची विजयगाथा दिसणार असल्याने निश्चितपणे कपिल देव यांच्यासोबत श्रीकांत, मदनलाल, मोहिंदर अमरनाथ, सुनील गावस्कर यासारखे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले अन्य खेळाडूही पडद्यावर दिसतील.   त्यांची भूमिका कोण वठवणार हेही लवकरच कळेल.
 

Web Title: Ranvir Singh will play with Kabir Khan 'cricket'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.