रणवीर सिंगचा Swag....! म्हणतोय, जयेशभाई जोरदार, जाणून घ्या कोण आहे हा जयेशभाई?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 13:41 IST2019-05-28T13:40:30+5:302019-05-28T13:41:24+5:30
रणवीर सिंग सध्या कबीर खान दिग्दर्शित '८३' चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे.

रणवीर सिंगचा Swag....! म्हणतोय, जयेशभाई जोरदार, जाणून घ्या कोण आहे हा जयेशभाई?
रणवीर सिंग सध्या कबीर खान दिग्दर्शित '८३' चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होण्याआधीच रणवीरने आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'जयेशभाई जोरदार'. या चित्रपटात रणवीर सिंग गुजराती तरूणाची भूमिका साकारणार आहे. हा कौटुंबिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्स करत आहे.
रणवीर सिंगने जयेशभाई जोरदार या चित्रपटाची घोषणा इंस्टाग्राम अकाउंटवर केली आहे. त्याने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, 'ही एक अद्भूत कथा आहे. माझा आगामी चित्रपट जयेशभाई जोरदारची घोषणा करताना मी खूप उत्साहीत आहे. '
'जयेशभाई जोरदार' चित्रपटाचे दिग्दर्शन दिव्यांक ठक्कर करणार आहेत. दिव्यांक या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. रणवीरने दिव्यांक सोबतचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत रणवीर दिव्यांकची ओळख करून देतो आहे. या व्हिडिओत तो गुजरातीमध्ये बोलताना दिसतो आहे आणि यासोबतच त्याने या चित्रपटाची हिंट दिली आहे.
रणवीर सिंग सध्या '८३' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. रणवीर सिंग आणि त्याच्या '८३' सिनेमाच्या संपूर्ण टीमला नुकतेच धर्मशालामध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यात आले. भारतीय क्रिकेट टीमचा पहिला वर्ल्डकप जिंकल्याचा हाच पराक्रम रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे.
या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
मात्र हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना १० एप्रिल, २०२० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.