कोण बादशहा? रॅपरला वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन पडलं महागात; चांगलाच बसला भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:10 IST2024-12-17T15:10:07+5:302024-12-17T15:10:48+5:30

रॅपरला भरावे लागले हजारो रुपये

rappper badshah fined by gurugram traffic police for breach of traffic rules | कोण बादशहा? रॅपरला वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन पडलं महागात; चांगलाच बसला भुर्दंड

कोण बादशहा? रॅपरला वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन पडलं महागात; चांगलाच बसला भुर्दंड

आपल्या हटके रॅपमुळे जगभरात प्रसिद्ध असलेला गायक, रॅपर बादशहाला (Badshah) वाहतुकीचे नियम पाळणं चांगलंच महागात पडलं आहे. गुरुग्राम ट्रॅफिक पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत त्याच्याकडून चलन वसूल केलं आहे. बादशहा असो किंवा कोणीही वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळलेच पाहिजेत असा संदेशच पोलिसांनी यातून दिला आहे. कॉन्सर्टला जाताना घाईघाईत बादशहाने नियमभंग केला आणि पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे.

गुरुग्राम येथील एरिया मॉलमध्ये बादशहाची कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती. याच ठिकाणी घाई घाईत पोहोचण्याच्या गडबजीत त्याने चूक केली. वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं नाही. यानंतर गुरुग्राम ट्रॅफिक पोलिसांनी चालान कापत त्याच्याकडून पैसे वसूल केले. कॉन्सर्टमध्ये लवकरच पोहोचायचं असल्याने त्याने चुकीच्या दिशेने गाडी नेली. यावेळी पोलिसांनी त्याला थांबवलं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळं कैद झाल्याचंही सांगितलं. यानंतर रॅपरला १५ हजार ५०० रुपयांचा दंड भरावा लागला. 

यासोबतच एरिया मॉलमध्ये करण औजलाच्या प्रोग्रॅममुळे ट्रॅफिक पोलिसांनी सूचना जारी केली आहे. १७ आणि १९ डिसेंबर ला होणाऱ्या कॉन्सर्टमुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता अधिक आहे. यासाठी त्यांनी इतर पर्याय दिले आहेत.

बादशहा अनेकदा काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याच्या चंदीगढ येथील नाईट क्लबमध्ये अज्ञातांनी स्फोट घडवून आणला. खंडणीसाठी त्यांनी हे कृत्य केलं. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.  बादशहा सध्या 'इंडियन आयडॉल' मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे.

Web Title: rappper badshah fined by gurugram traffic police for breach of traffic rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.