अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार रश्मिका मंदाना, घेणार इतके कोटी मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 06:00 AM2021-01-04T06:00:00+5:302021-01-04T06:00:00+5:30

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Rashmika Mandana will share the screen with Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार रश्मिका मंदाना, घेणार इतके कोटी मानधन

अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार रश्मिका मंदाना, घेणार इतके कोटी मानधन

googlenewsNext

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच तिने आपल्या मानधनात वाढ केल्याचे समजते आहे.

पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, रश्मिका मंदानाने विकास बहल यांचा 'डेडली' हा आगामी चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटात ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहे. चित्रपटासाठी रश्मिकाने चक्क कोटींच्या घरात मानधन घेतल्याचे सांगण्यात येत आहे.


'डेडली' चित्रपटासाठी रश्मिकाने तब्बल ५- ६ कोटी रुपये मानधन घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र विकास बहल यांनी चित्रपटाबद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. 


रश्मिका 'मिशन मजनू' चित्रपटाच्या माध्यमातून ती लवकरच मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा देखील झळकणार आहे. या चित्रपटात १९७० पाकिस्तानमधील भारताच्या धाडसी मोहिमेची ही कथा आहे, ज्याने दोन्ही देशांमधील संबंध कायमचे बदलले. परवेज शेख, असीम अरोड़ा आणि सुमित बठेजा यांनी लिहिलेली जासूसी थ्रिलर चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​एक रॉ एजेंट म्हणून काम करताना दिसणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसणार आहे.


याबद्दल अभिनेत्री रश्मिका मंदाना सांगते की, 'मला विविध भाषा बोलणाऱ्या प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे, याचा मला खूप आनंद आहे. पुढे म्हणाली की, या चित्रपटाची कथा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, याबद्दल मी निर्मात्यांची आभारी आहे की, त्यांनी मला या चित्रपटाची ऑफर दिली.

Web Title: Rashmika Mandana will share the screen with Amitabh Bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.