रश्मिका मंदानाने 'छावा'चं केलं कौतुक; म्हणाली, "भोसले कुटुंबातील प्रत्येक पुरुष..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 10:53 IST2025-02-01T10:52:42+5:302025-02-01T10:53:00+5:30
रश्मिकाने का मागितली विकी कौशलची माफी?

रश्मिका मंदानाने 'छावा'चं केलं कौतुक; म्हणाली, "भोसले कुटुंबातील प्रत्येक पुरुष..."
अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) 'छावा' (Chhava) सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाचा ट्रेलर सर्वांनाच आवडला आहे. विकी कशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत शोभून दिसत आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. सध्या सगळीकडेच सिनेमाच्या ट्रेलरचंही कौतुक होतं. एका सीनमुळे झालेल्या वादानंतर आता तो सीन मेकर्सने काढला आहे. काल सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटसाठी विकी कौशल आणि रश्मिकाने हजेरी लावली. रश्मिकाने विकीसाठी खास पोस्ट लिहिली असून त्याची माफीही मागितली आहे. नक्की काय आहे पोस्ट वाचा.
रश्मिका मंदानाने 'छावा'च्या सिनेमाच्या कालच्या इव्हेंटचे काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने विकी कौशलला ओवाळलं. यासोबत तिने लिहिले, "महाराज! भोसले कुटुंबातील प्रत्येक पुरुष हा पहाडी तूफान आहे. तू विकी कौशल आणि राजे या दोन्ही रुपात तुफान आहेस. तू नेहमीच सगळ्यांना खास असल्याची भावना करुन देतोस. हैदराबादमध्ये आल्याबद्दल तुझं स्वागत. आणि पुढच्या वेळी तुझं व्यवस्थित स्वागत करण्याची मला संधी दे."
ती पुढे लिहिते, "पूर्ण जोमाने तुझ्यासोबत प्रमोशनसाठी फिरु शकेन या अवस्थेत मी नाही त्यासाठी मला माफ कर. पण मी शक्य ते सगळं करेन."
रश्मिकाच्या या पोस्टवर विकीने कमेंट करत लिहिले, "महारानी! तू बरी हो हे कशाही पेक्षा जास्त महत्वाचं आहे. लवकरच भेटू." रश्मिकाच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती व्हीलचेअरवरच आहे आणि तशीच प्रमोशनलाही येत आहे. रश्मिकाच्या या उत्साहाला चाहत्यांनीही दाद दिली आहे.
'छावा' १४ फेब्रुवारी रोजी रिलीज होत आहे. लक्ष्मण उतेकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमात विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, डायना पेंटी यांची भूमिका आहे.