"पायाला लागलं तरीही.."; 'छावा'च्या ट्रेलर लाँचला रश्मिका मंदानाने व्यक्त केल्या भावना, म्हणाली- "येसूबाईंची भूमिका म्हणजे.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 19:16 IST2025-01-22T19:16:15+5:302025-01-22T19:16:31+5:30
रश्मिका मंदानाने 'छावा'च्या ट्रेलर लाँचला तिच्या भावना व्यक्त करुन महाराणी येसूबाईंच्या भूमिकेसाठी कृतज्ञता व्यक्त केलीय (chhaava, rashmika mandanna)

"पायाला लागलं तरीही.."; 'छावा'च्या ट्रेलर लाँचला रश्मिका मंदानाने व्यक्त केल्या भावना, म्हणाली- "येसूबाईंची भूमिका म्हणजे.."
रश्मिका मंंदाना ही 'छावा' सिनेमात महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत आहे. ट्रेलर लाँचच्या वेळेस रश्मिकाच्या पायाला दुखापत झाली असूनही ती हैदराबादहून प्रवास करुन मुंबईत आली. रश्मिकाने ट्रेलर लाँचच्या वेळेस तिच्या मनातल्या भावना शेअर केल्या. याशिवाय महाराणी येसूबाईंची भूमिका साकारतानाचा विलक्षण अनुभव तिने सांगितला. काय म्हणाली रश्मिका. जाणून घ्या
रश्मिकाने सांगितला येसूबाईंच्या भूमिकेचा अनुभव
रश्मिका मंदाना ट्रेलर लाँचच्या वेळेस म्हणाली की, "आयुष्यात एकदाच अशी भूमिका साकारायची संधी मिळते. मला ती गमवायची नव्हती. माझ्यासाठी हा सर्वात खास सिनेमा आहे आणि त्याचं आज ट्रेलर लाँच आहे. माझ्या पायाला लागलं असलं तरी हैद्राबाद ते मुंबई फक्त या सिनेमासाठी मी आले. मी ही संधी सोडूच शकत नव्हते. मला काहीही करून यायचंच होतं."
रश्मिका पुढे म्हणाली की, "महाराणींच्या भूमिकेबद्दल सांगायचं तर, मला माहित नाही लक्ष्मण सरांनी माझ्यात असं काय पाहिलं. पण मी पूर्ण प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला माझं काम आवडेल अशी आशा आहे. मी तुमच्या या कुटुंबाचा भाग झाले आहे आणि तुम्ही मला स्वीकाराल अशी अपेक्षा आहे. छावा माझ्यासाठी खूप खास सिनेमा आहे. याशिवाय येसूबाईंची भूमिका साकारणं हा माझ्यासाठी खास अनुभव आहे." रश्मिका मंदाना-विकी कौशलची भूमिका असलेला 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज होतोय.