Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाच्या फ्लाइटचं इमर्जन्सी लँडिंग; म्हणाली, "मृत्यूपासून थोडक्यात वाचली..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 13:04 IST2024-02-18T12:54:59+5:302024-02-18T13:04:23+5:30
Rashmika Mandanna : रश्मिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्यासोबत घडलेली धक्कादायक घटना शेअर केली आहे. ज्यामध्ये ती मृत्यूपासून थोडक्यात बचावली आहे.

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाच्या फ्लाइटचं इमर्जन्सी लँडिंग; म्हणाली, "मृत्यूपासून थोडक्यात वाचली..."
लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रश्मिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्यासोबत घडलेली धक्कादायक घटना शेअर केली आहे. ज्यामध्ये ती मृत्यूपासून थोडक्यात बचावली आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टनंतर चाहत्यांना तिची चिंता वाटत आहे.
अभिनेत्री ज्या फ्लाइटने प्रवास करत होती, त्याचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. रश्मिकाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिच्या सीटवर बसलेली दिसत आहे. हे शेअर करताना रश्मिकाने लिहिलं की, "फक्त माहितीसाठी, अशा प्रकारे आम्ही मृत्यूपासून वाचलो आहोत..."
फोटोमध्ये रश्मिकासोबत अभिनेत्री श्रद्धा दासही दिसत आहे. हे विमान मुंबईहून हैदराबादला जात होते. मात्र त्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे विमान परत मुंबईत उतरवण्यात आलं. मात्र, विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. कोणालाही दुखापत झाली नाही.
अभिनेत्री 'पुष्पा 2'च्या शूटिंगमध्ये व्यस्त
रश्मिका अलीकडेच संदीप रेड्डी वांगा यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'ॲनिमल'मध्ये दिसली होती. सध्या अभिनेत्री तिच्या बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट यावर्षी 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा आहे.