Animal मधील रश्मिकाच्या 'त्या' डायलॉगची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, दिग्दर्शकाने दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 03:44 PM2023-11-30T15:44:47+5:302023-11-30T15:45:20+5:30

Animal चा तो डायलॉग तुम्हाला तरी समजला का?

Rashmika Mandanna gets trolled for her dialogue in Animal movie director explains | Animal मधील रश्मिकाच्या 'त्या' डायलॉगची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, दिग्दर्शकाने दिलं स्पष्टीकरण

Animal मधील रश्मिकाच्या 'त्या' डायलॉगची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, दिग्दर्शकाने दिलं स्पष्टीकरण

हिंदी मनोरंजनसृष्टीत सध्या Animal सिनेमाच्या ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे. रणबीर कपूरचा धाँसू लूक आणि बॉबी देओलचा खतरनाक अवतार यामुळे चाहते सिनेमा पाहण्यासाठी आणखी आतूर झाले आहेत. ट्रेलरमध्ये रश्मिका मंदानारणबीर कपूरकडे पाहून रागारागात एक डायलॉग म्हणते. पण ती नक्की काय बोलतेय हे कोणालाच कळत नाही. यानंतर रश्मिकाला प्रचंड ट्रोल केले गेले. आता यावर दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने स्पष्टीकरण दिलं आहे.

Animal च्या अॅडव्हान्स बुकिंगला तुफान प्रतिसाद मिळत आहे. काहीच दिवसात सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच १४ कोटींचा गल्ला जमवला आहे. रणबीर कपूरच्या अभिनयाचं खूप कौतुक होतंय. तसंच बॉबी देओलसोबतच्या अॅक्शन सीन्सचीही चर्चा आहे. ट्रेलरमधील रश्मिका मंदानाचा एक डायलॉग चांगलाच व्हायरल होतोय. यामध्ये ती रणबीर कपूरसमोर अगदी रागारागात डायलॉग म्हणते. पण ती नक्की काय बोलते हे कोणालाच कळत नाही. यावरुन सोशल मीडियावर तिची खूप खिल्ली उडवली गेली. 

सिनेमाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आता रश्मिकाच्या मदतीला धावून आले आहेत. ते म्हणाले,'रश्मिकाचा हा डायलॉग सिनेमात खूप जास्त महत्वाचा होता. तिने तो त्याच पद्धतीने बोलणं अपेक्षित होतं. हा एक इमोशनल सीन आहे. जेव्हा कोणी अशा भावनेतून जातो तेव्हा तो दात ओठ खाऊन बोलतो. जेव्हा तुम्ही सिनेमात हा डायलॉग बघाल त्या क्षणी तुम्हाला संबंध कळेल.'

रश्मिकाचा डायलॉग नेमका आहे तरी काय?

रश्मिका म्हणते,'तुम्हारे पापा के लिए तुम्हाला प्यार जोग नही बल्कि एक रोग है. मै दिल से चाहती हूँ की वो उस दिन मर जाएँ'

Web Title: Rashmika Mandanna gets trolled for her dialogue in Animal movie director explains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.