रडणाऱ्या रश्मिक मंदान्नाला पाहून आईने दिला होता हा मोलाचा सल्ला, अन् एक क्षणात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 01:24 PM2023-04-21T13:24:29+5:302023-04-21T13:30:19+5:30
पाच वर्षांआधी रश्मिका मंदाना हे नाव फार कुणाला ठाऊकही नव्हतं. आज अख्ख्या जगात रश्मिकाचे फॅन्स आहेत.
साऊथमधील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) गेल्या पाच वर्षात नॅशनल क्रश बनली आहे. तसेच तिने फिल्मी दुनियेत घवघवीत यश मिळवून. पुष्पा चित्रपटाना तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. पाच वर्षांआधी रश्मिका मंदाना हे नाव फार कुणाला ठाऊकही नव्हतं. आज अख्ख्या जगात रश्मिकाचे फॅन्स आहेत.साऊथ फिल्म इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडमध्येही रश्मिकाची जबरदस्त फॅन फॉलोइंग पाहायला मिळते. कर्नाटकच्या कोडागु येथे जन्मलेल्या रश्मिकाने 2016 मध्ये ‘किरिक पार्टी’ या कन्नड चित्रपटाद्वारे अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली होती. रश्मिकाचा पहिलाच सिनेमा गाजला.
रश्मिका म्हणाली होती की, तिला आईने दिलेल्या सल्ल्यामुळे आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत मिळाली. तिने सांगितले की, मी लहान असताना कोणतीही समस्या घेऊन आईकडे जायचे, तेव्हा ती नेहमी म्हणायची की तू का रडतेस. रडणे थांबव. तुला काय वाटतं आयुष्यातील हीच सर्वात मोठी समस्या आहे, तर ते तसे नाहीय.
रश्मिका मंदान्ना पुढे म्हणाली, "माझी आई नेहमी म्हणते की तुम्ही कितीही अडचणीत असलीस तरी, तुला ते इतरांना दाखवण्याची गरज नाही कारण तुझ्या अडचणींशी इतरांना काही घेणे देणं नसते." म्हणूनच हे चांगले आहे की आपण आपल्या समस्या स्वतः सोडवल्या पाहिजेत आणि जगाला फक्त सर्व काही ठीक आहे हेच दाखवलं पाहिजे.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर रश्मिका रणबीर कपूरसोबत 'अनिमल' या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर ती अल्लू अर्जुनसोबत पुष्पा 2 या चित्रपटातही श्रीवल्लीची भूमिका साकारताना दिसेल.