रश्मिका मंदानाच नाही तर तिचा डॉगीही चर्चेत...! ऐकून ‘श्रीवल्ली’ला आवरेना हसू...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 12:50 IST2022-06-26T12:50:30+5:302022-06-26T12:50:50+5:30
Rashmika Mandanna : ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी रश्मिका सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. होय, कारण आहे तिचा डॉगी.

रश्मिका मंदानाच नाही तर तिचा डॉगीही चर्चेत...! ऐकून ‘श्रीवल्ली’ला आवरेना हसू...!!
साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिची वेगळी करून देण्याची गरज नाही. ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी रश्मिका सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. होय, कारण आहे तिचा डॉगी. रश्मिकानं चक्क आपल्या पाळीव डॉगीसाठी विमानाचं तिकीट मागितल्याची चर्चा सुरु आहे आणि हे ऐकून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, आऊटडोअर शूटींग असेल तर माझ्यासाठी दोन विमानाची तिकिटं बुक करावी लागतील. एक माझ्यासाठी आणि एक माझ्या डॉगीसाठी, अशी रश्मिकाची पहिली अट असते म्हणे. मी माझ्या लाडक्या डॉगीशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे आपण जिथे जाऊ, तिथे ऑरा (रश्मिकाच्या डॉगीचं नाव) सोबत असेन, असं ती निर्मात्यांना आधीच सांगते, असंही कानावर येतेय.
काय खरं नि काय खोटं?
रश्मिकाची ही अट ऐकून सगळेच थक्क झालेत. पण ही गोष्ट जेव्हा रश्मिकाच्या कानावर गेली, तेव्हा तिला हसू आवरणं कठीण झालं. तिने ट्विट करत, असं काहीही नसून या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं. शिवाय अशा चुकीच्या गोष्टी न पसरवण्याचं आवाहनही केलं. ‘इतकं स्वार्थी बनू नका. मी ऑराला माझ्यासोबत न्यावं, अशी तुमची इच्छा असली तरी मी सांगू इच्छिते की, तिला मात्र माझ्यासोबत ट्रॅव्हल करण्याची अजिबात इच्छा नाही. ती हैदराबादेत खूप आनंदी आहे. तुम्ही चिंता दाखवली, त्याबद्दल आभार,’ असं ट्विट तिनं केलं. ‘सॉरी, पण या बातमीने माझा दिवस मजेत गेला. मला हसू आवरत नाहीये,’ असं दुसरं ट्विटही तिने केलं.
Sorry but this made my day..🤣 couldn’t stop laughing..🤣🤣
— Rashmika Mandanna (@iamRashmika) June 24, 2022
रश्मिकाच्या या ट्विटवर फॅन पेजने रिप्लाय दिला. ‘हे तर काहीच नाही, तुझ्याबद्दलच्या अशा अनेक चर्चा होतात,’असं फॅन पेजने लिहिलं. यावर ‘खरंच? मला त्या सगळ्या पाठवा. देवा, माझ्या चाहत्यांना काय काय ऐकायला मिळतं... मला वाईट वाटतंय,’ असं तिने म्हटलं आहे.
मंदानाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या ती अनेक प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. अमिताभ बच्चनसोबत ‘गुडबाय’ या सिनेमात ती दिसणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ आणि रणबीर कपूरसोबत ‘अॅनिमल’मध्ये ती झळकणार आहे. शिवाय पुष्पा 2 मध्ये ती आहेच.