"महाराणी येसूबाईंच्या भूमिकेनंतर मी आता निवृत्ती...", 'छावा'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर काय म्हणाली रश्मिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 14:06 IST2025-01-23T14:05:45+5:302025-01-23T14:06:34+5:30

महाराणी येसूबाईंच्या भूमिकेनंतर रश्मिका निवृत्ती घेणार? म्हणाली- "'छावा'चा ट्रेलर पाहिल्यानंतर..."

rashmika mandanna said i can happily retired after playing maharani yesubai role in chhaava | "महाराणी येसूबाईंच्या भूमिकेनंतर मी आता निवृत्ती...", 'छावा'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर काय म्हणाली रश्मिका?

"महाराणी येसूबाईंच्या भूमिकेनंतर मी आता निवृत्ती...", 'छावा'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर काय म्हणाली रश्मिका?

रश्मिका मंदाना तिच्या आगामी 'छावा' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. तर रश्मिका महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'छावा' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यावेळी रश्मिकाने भूमिकेप्रती तिच्या भावना व्यक्त केल्या. 

"महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणं ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात खास गोष्ट आहे. मी लक्ष्मण सरांना हे बोलू शकते की मी आता निवृत्ती घेऊ शकते, इतकी खूश आहे. मी लगेच भावनिक होत नाही. मला लगेच रडूही येत नाही. पण, हा ट्रेलर पाहून मी भावुक झाले", असं रश्मिका म्हणाली. 


रश्मिकाच्या पायाला दुखापत झाली असतानाही ती हैदराबादहून 'छावा' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चसाठी मुंबईला आली होती. याबाबत ती म्हणाली, "आयुष्यात एकदाच अशी भूमिका साकारायची संधी मिळते. मला ती गमवायची नव्हती. माझ्यासाठी हा सर्वात खास सिनेमा आहे आणि त्याचं आज ट्रेलर लाँच आहे. माझ्या पायाला लागलं असलं तरी हैद्राबाद ते मुंबई फक्त या सिनेमासाठी मी आले. मी ही संधी सोडूच शकत नव्हते. मला काहीही करून यायचंच होतं."

रश्मिका पुढे म्हणाली की, "महाराणींच्या भूमिकेबद्दल सांगायचं तर, मला माहित नाही लक्ष्मण सरांनी माझ्यात असं काय पाहिलं. पण मी पूर्ण प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला माझं काम आवडेल अशी आशा आहे. मी तुमच्या या कुटुंबाचा भाग झाले आहे आणि तुम्ही मला स्वीकाराल अशी अपेक्षा आहे. छावा माझ्यासाठी खूप खास सिनेमा आहे. याशिवाय येसूबाईंची भूमिका साकारणं हा माझ्यासाठी खास अनुभव आहे."  रश्मिका मंदाना-विकी कौशलची भूमिका असलेला 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. 

Web Title: rashmika mandanna said i can happily retired after playing maharani yesubai role in chhaava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.