विजय देवराकोंडाबरोबर डेटिंगच्या चर्चा दरम्यान रश्मिका मंदानाचा मोठा खुलासा, म्हणाली, "माझं लग्न..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 12:53 PM2023-08-05T12:53:00+5:302023-08-05T12:53:35+5:30
रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यादरम्यानच अभिनेत्रीने तिचं लग्न झाल्याचा खुलासा केला आहे.
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेली रश्मिका नॅशनल क्रश आहे. रश्मिका आणि दाक्षिणात्य अभिनेता विजय देवराकोंडा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर दोघांनीही भाष्य करणं टाळलं होतं. परंतु, आता रश्मिकाने स्वत:च लग्न केल्याचा खुलासा केला आहे.
रश्मिकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. “माझं लग्न झालं आहे...”, असं रश्मिका म्हणाली. रश्मिकाच्या या वक्तव्यानंतर चाहतेही अवाक् झाले होते. परंतु, नंतर रश्मिकाने जपानी टीव्ही सीरिज कॅरेक्टर नरूटोबरोबर गुपचूप विवाह केल्याचं सांगितलं. त्यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला होता. एनीमी ही लोकप्रिय जपानी टीव्ही सीरीज आहे. यातील मुख्य भूमिकेत असलेल्या नरूटो या कॅरेक्टरचे अनेक चाहते आहेत.
"तुमचा बिअर बार आहे का?", समीर वानखेडेंनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले, "डान्स बार..."
काजोलचा दोन वेळेला झालेला गर्भपात, बाळ गमावल्यानंतर अभिनेत्रीची झालेली अशी अवस्था
“नरूटो मला खूप आवडतो. माझं ह्दय त्याच्याकडे आहे. मी त्याच्याशी विवाहही केला आहे,” असं रश्मिका म्हणाली. या मुलाखतीत रश्मिकाने एनीमी कॅरेक्टर हिनाता सारखं बनण्याची इच्छाही व्यक्त केली. तिच्यासारखे निळे केस करण्याची इच्छा असल्याचं रश्मिकाने सांगितलं. दरम्यान, रश्मिकाने गीता गोविंदम, मिशन मजनू, डिअर कॉम्रेड, वारीसू या चित्रपटांत काम केलं आहे.