क्यूट लूकमध्ये रश्मिका मंदाना जिममध्ये वर्कआउट करताना दिसली, बघता बघता व्हायरल झाला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 15:15 IST2022-03-29T15:12:45+5:302022-03-29T15:15:00+5:30
Rashmika Mandanna Video : रश्मिका आपल्या फिटनेससोबतच तिच्या क्यूटनेससाठी ओळखली जाते. म्हणूनच ती नॅशनल क्रश म्हणूनही लोकप्रिय आहे.

क्यूट लूकमध्ये रश्मिका मंदाना जिममध्ये वर्कआउट करताना दिसली, बघता बघता व्हायरल झाला व्हिडीओ
रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही फिटनेसच्या बाबतीत सर्वात जास्त सीरिअस अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. तिच्या इन्स्टाग्रामवर तिने तिचे वर्कआउट करतानाचे व्हिडीओ आणि फोटो बघू शकता. हाय इंटेसिटी वर्कआउट असो वा रूटीन वर्कआउट फिट राहण्यासाठी आणि परफेक्ट फीगरसाठी ती खूप मेहनत घेते. रश्मिका आपल्या फिटनेससोबतच तिच्या क्यूटनेससाठी ओळखली जाते. म्हणूनच ती नॅशनल क्रश म्हणूनही लोकप्रिय आहे. सध्या तिचा एक वर्कआउटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात ती किती मेहनत घेते बघायला मिळतं.
रश्मिका मंदानाने तिच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा जिममधील व्हिडीओ शेअर केला आहे. रश्मिका यात हार्ड कार्डियो, स्क्वाट्स, लो किक, हाय जंपसारखे वर्कआउट करताना दिसत आहे. रश्मिका यात कोणत्याही साहित्यांविना बॉडी फिट ठेवण्यासाठी वर्कआउट करताना दिसत आहे. या व्हिडीओची खासियत म्हणजे रश्मिका तिचा वर्कआउट एन्जॉय करताना दिसत आहे. तिचा जिमचा लूकही अनेकांना आवडला. ती यात टी-शर्ट आणि ब्लॅंक शॉर्ट पॅंटमध्ये हॉट दिसत आहे.
रश्मिका मंदानाच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो की, काही तासातच या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर फॅन्स हार्ट इमोजींचा पाऊस पाडत आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर रश्मिका मंदाना 'पुष्पा'नंतर आता सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ती बॉलिवूड डेब्यू करत आहे. हा सिनेमा १० जूनला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. त्यानंतर रश्मिका अमिताभ बच्चन यांच्यासोबत आणखी एक हिंदी सिनेमा 'अलविदा'मध्ये दिसणार आहे.