Rashmika Mandanna Troll: स्वतःला शाकाहारी म्हणवणाऱ्या रश्मिका मंदानाचा 'चिकन बर्गर'वर ताव; झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 18:18 IST2023-05-11T18:15:24+5:302023-05-11T18:18:16+5:30
स्वत:ला शाकाहारी म्हणवून घेणाऱ्या रश्मिकाला अनेक सोशल मीडिया यूजर्सनी खोटारडी म्हटलं आहे.

Rashmika Mandanna Troll: स्वतःला शाकाहारी म्हणवणाऱ्या रश्मिका मंदानाचा 'चिकन बर्गर'वर ताव; झाली ट्रोल
रश्मिका मंदान्ना आजच्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अल्लू अर्जुनसोबत पुष्पा या चित्रपटात दिसल्यानंतर ती प्रकाशझोतात आली. रश्मिका ही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते आणि तिला अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. सध्या अभिनेत्रीला तिच्या एका जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये चिकन बर्गर खाल्ल्यामुळे ट्रोल केले जात आहे. स्वत:ला शाकाहारी म्हणवून घेणाऱ्या रश्मिकाला अनेक सोशल मीडिया यूजर्सनी खोटारडी म्हटलं आहे.
एका जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये, रश्मिका मंदान्ना एका लोकप्रिय जंक फूड ब्रँडची जाहिरात करण्यासाठी चिकन बर्गर खाताना दिसत आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्रीने स्वतःला खऱ्या आयुष्यात शाकाहारी असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे जेव्हा तिचा चिकन बर्गर खाताना जाहिरातीचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा ती ट्रोर्लसच्या निशाण्यावर आली. एका ट्रोलने लिहिले की, 'ते पैशासाठी काहीही करतात.'
नेटिझन्स रश्मिकाला 'खोटारडी' म्हणत आहेत. नॉनव्हेज बर्गर खाल्ल्यामुळं ट्रोल होण्यासोबतच जंक फूड ब्रँडला प्रमोट केल्यामुळे ही रश्मिकाला ट्रोल केलं जात आहे. एका यूजरने कमेंट केली आहे की, "डबल स्टँडर्ड, आधी मी शाकाहारी आहे आणि आता चिकन बर्गर खात आहे आणि त्याचे प्रमोशनही करत आहे." दुसर्या यूजर्सने लिहिले, ''लाखो रुपये मिळेपर्यंत ती शाकाहारी होती, त्यानंतर ती मांसाहारी झाली.''
रश्मिका मंदान्नाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ही अभिनेत्री अखेरची विजय-स्टार तामिळ चित्रपट 'वारीसु' मध्ये दिसली होती. तिच्याकडे संदीप रेड्डी वंगा यांचा अॅनिमल हा हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. हा चित्रपट यावर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या रश्मिका इतर अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे.