Aashiqui 3: ना दीपिका, ना श्रद्धा...! ‘आशिकी 3’मध्ये कार्तिक आर्यनसोबत झळकणार साऊथची ‘ही’ बाला...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 11:33 AM2022-09-30T11:33:02+5:302022-09-30T11:40:49+5:30

Aashiqui 3: ‘आशिकी 3’ (Aashiqui 3) येतोय आणि कार्तिक आर्यन (Karthik Aryan) या चित्रपटात लीड रोलमध्ये दिसणार आहे.  ‘आशिकी 3’ या सुपरहिट फ्रेंन्चाइजीची घोषणा झाल्यापासून चाहते क्रेझी झाले आहेत. पण हिरोईनचं काय?

Rashmika Mandanna Will Romance Karthik Aryan In Aashiqui 3 | Aashiqui 3: ना दीपिका, ना श्रद्धा...! ‘आशिकी 3’मध्ये कार्तिक आर्यनसोबत झळकणार साऊथची ‘ही’ बाला...!!

Aashiqui 3: ना दीपिका, ना श्रद्धा...! ‘आशिकी 3’मध्ये कार्तिक आर्यनसोबत झळकणार साऊथची ‘ही’ बाला...!!

googlenewsNext

‘आशिकी 3’ (Aashiqui 3) येतोय आणि कार्तिक आर्यन (Karthik Aryan) या चित्रपटात लीड रोलमध्ये दिसणार आहे.  ‘आशिकी 3’ या सुपरहिट फ्रेंन्चाइजीची घोषणा झाल्यापासून चाहते क्रेझी झाले आहेत. या फ्रेन्चाइजीमध्ये कार्तिक झळकणार म्हटल्यावर तर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण हिरोईनचं काय? कार्तिकची हिरोईन कोण असणार? हे मात्र गुलदस्त्यात आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘आशिकी 3’मध्ये कोणत्या अभिनेत्री वर्णी लागणार? यावरून जोरदार चर्चा सुरू झाली होती. दीपिका पादुकोणपासून क्रिती सॅनन, श्रद्धा कपूर यांची नावं चर्चेत होती. पण आता कदाचित ही ‘रेस’ साऊथच्या  अभिनेत्रीनं जिंकली आहे. होय, चर्चा खरी मानाल तर ‘पुष्पा’ फेम श्रीवल्ली अर्थात रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna ) ‘आशिकी 3’मध्ये झळकणार आहे.

अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही पण ‘आशिकी 3’मध्ये रश्मिकाची वर्णी लागल्याचं कळतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेकर्सनी ‘आशिकी 3’साठी रश्मिकाचं नाव फायनल केलं आहे. रश्मिका व कार्तिक यांनी याआधी एकत्र काम केलेलं नाही. त्यामुळे ही जोडी पडद्यावर फ्रेश दिसेल, असं मेकर्सचं मत आहे. अनेकांनी ही फ्रेश जोडी आणि त्यांचा ऑनस्क्रीन रोमान्स पाहायला आवडेल, असंही म्हटलं जात आहे.

‘पुष्पा’ या चित्रपटानंतर रश्मिकाची डिमांड फारच वाढली. लवकरच ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. ‘गुडबाय’ या चित्रपटात ती अमिताभ बच्चन यांच्योबत दिसणार आहे. हा सिनेमा येत्या 7 ऑक्टोबरला रिलीज होतोय. याशिवाय सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे. एकंदर काय तर सगळेच रश्मिकाच्या प्रेमात आहेत आणि अशात रश्मिका बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकून एक एक प्रोजेक्ट बळकावतेय.

1990 साली रिलीज झालेला ‘आशिकी’ हा सिनेमा महेश भट यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात राहुल रॉय आणि अनु अग्रवाल मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट इतका गाजला होता की अनु व राहुल रॉय एका रात्रीत स्टार झाले होते. या चित्रपटाची गाणी लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती. 2013 मध्ये ‘आशिकी 2’ हा सिनेमा आला. मोहित सूरी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात श्रद्धा कपूर व आदित्य रॉय लीड रोलमध्ये होते. हा चित्रपटही सुपरडुपर हिट ठरला होता. आता कार्तिकचा ‘आशिकी 3’ बॉक्स ऑफिसवर काय जादू करतो, ते बघूच.

Web Title: Rashmika Mandanna Will Romance Karthik Aryan In Aashiqui 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.