रश्मिका मंदाना पेक्षाही क्यूट आहे तिची लहान बहीण, फोटो बघून तुम्हीही ठेवाल विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 14:10 IST2023-02-21T14:09:39+5:302023-02-21T14:10:12+5:30
Rashmika Mandanna : रश्मिकाची लहान बहीण तिच्यापेक्षा 17 वर्षाने लहान आहे. रश्मिका नेहमीच तिच्या बहिणीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

रश्मिका मंदाना पेक्षाही क्यूट आहे तिची लहान बहीण, फोटो बघून तुम्हीही ठेवाल विश्वास
Rashmika Mandanna : नॅशनल क्रश म्हणून फेमस असलेली अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या अदांवर फॅन्स फिदा असतात. नेहमीच इव्हेंटस आणि एयरपोर्टवर तिच्या नम्रपणाचं कौतुक होत असतं. रश्मिकाचा निरागस चेहरा आणि तिच्या अदांमुळे ती खूप लोकप्रिय आहे. पण तुम्हाला माहीत नसेल की, रश्मिकाची लहान बहीण तिच्यापेक्षा जास्त क्यूट आहे.
रश्मिकाची लहान बहीण तिच्यापेक्षा 17 वर्षाने लहान आहे. रश्मिका नेहमीच तिच्या बहिणीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
रश्मिकाच्या लहान बहिणीचं नाव सिमिओन आहे. तिचं वय केवळ 9 वर्षे आहे. तर रश्मिका ही 26 वर्षांची आहे. सिमिओन आणि रश्मिकाच्या वयात मोठं अंतर आहे. पण ती तिच्या बहिणीच्या खूप जवळ आहे. त्यांचं बॉन्डिंग चांगलं आहे.
रश्मिकाच्या इन्स्टा अकाऊंटवर तुम्ही तिच्या बहिणीसोबतचे फोटो बघू शकता. काही फोटोंमध्ये रश्मिका आई-वडील आणि बहिणीसोबत दिसत आहे.
एका फोटोत रश्मिका तिचा डॉगी आणि बहीण सिमिओनसोबत मस्ती करताना दिसत आहे.